ऑनलाइन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा अडचणीत सापडाल

know how to be safe during online shopping Marathi Article
know how to be safe during online shopping Marathi Article
Updated on

आजकाल ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्वयंपाक घरातील किराणा ते कपड्यांपर्यंत सर्व वस्तू ऑनलाईन विकत घेता येतात. पण ऑनलाइन शॉपिंग करणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे का? ऑनलाईन शॉपिंग करताना काही धोके आहेत, जर तुम्ही खरेदी करताना योग्य काळजी घेतली नाही तर तुमची फसवणूक होऊ  शकते. आज आपण या संबंदी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. 

विश्वसनीय वेबसाइट्स वापरा

सुरक्षित ऑनलाईन खरेदी करण्यासाठी सिक्युअर सॉकेट लेयर (एसएसएल) इन्स्टॉल केलेल्या साइट्सवरच खरेदी करा, कारण या साइट्स वापरकर्त्यांचा इनपुट केलेला डेटा सुरक्षितमणे संग्रहित करण्यास सक्षम आहेत. या साइट्स ओळखणे सोपे आहे, यांचे युआरएल हे HTTP: // ऐवजी HTTPS: // ने सुरु होते आणि त्यांच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये लॉक्ड पॅडलॉक चिन्ह  दिसते. 
कितीहा आकर्षक दिसत असल्या तरी आपल्याला माहिती नसलेल्या वेबसाइट्स वापरू नका. काळजीपुर्वक पाहिल्यास अशा फसव्या वेबसाईटवर शब्द आणि माहितीमध्ये तुम्हाला चूका सापडतील. सोशल मीडिया बुटीक मधून खरेदी करताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अशी अनेक खाती आहेत जी वापरकर्त्याची माहिती चोरण्यासाठी तयार केलेली असतात.
 

पासवर्ड आणि कार्डची माहिती 

तुमचा पासवर्ड हा जितका लहान आणि सोपा ठेऊ नका त्यामुळे तुमचे अकाऊंट हॅक होण्याचा धोका वाढते.  चांगल्या सुरक्षित पासवर्डसाठी अपरकेस, लोअरकेस, क्रमांक आणि चिन्हे या सगळ्यांचा वापर करावा. ऑनलाईन अकाउंटसाठी वेगवेगळे पासवर्ड सेट करा, सर्व खात्यांसाठी एकच पासवर्ड धोकादायक ठरू शकतो. आपली डेबिट आणि क्रेडिट कार्डसंबंधीची माहिती कोणत्याही वेबसाइटवर सेव्ह करू नका. अशा परिस्थितीत, जर ती वेबसाइट क्रॅक झाली किंवा कंप्यूटर लहान असेल तर हॅकर सेव केलेल्या माहितीवर डल्ला मारु शकतात.  

सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा

आपण सार्वजनिक ठिकाणचा कंप्यूटर वापरत असल्यास, त्यावर आपली माहिती देणे धोक्याचे ठरु शकते. दरम्यान याला उपाय म्हणजे तुमेच काम झाल्यावर  लॉग आउट करा आणि ब्राउझरची हिस्ट्री क्लिअर करा.  आपण सार्वजनिक वाय-फाय वापरताना आपल्या स्वतःच्या कंप्युटरवर खरेदी करीत असलात तरीही ते आपल्यासाठी धोकादायक आहे. 

बँक स्टेटमेंट वेळीवेळी तपासत रहा

आपल्या बँक खात्याच्या स्टेटमेंट्सवर लक्ष ठेवा, जेणेकरून कोणताही चुकीचा व्यवहार होईल तेव्हा आपल्याला ते माहित असेल आणि तुम्ही योग्य कारवाई करू शकाल.  काही 

हे आहेत धोक्याची लक्षणे 

जर साइटवरील डिल ही खूपच चांगली असेल तर अशा वेळी फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. भेटवस्तूच्या बहाण्याने किंवा स्वस्त दराने खरेदीच्या नावाखाली वेबसाइटला आपली माहिती देण्यास सांगितले जात असेल तर तो देखील सापळा असू शकतो. असे प्रकार सोशल मीडियावर बर्‍याचदा घडतात.

ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय करावे!

कधीकधी आकर्षक ऑफर देऊन फसवणूक केली जाते, तर काही वेळा खरेदी केलेल्या वस्तूपेक्षा तीसरीच वस्तू तुम्हाला मिळते.  या आणि अशा अनेक मार्गांनी फसवणूक होताना दिसते. जर तुम्ही कधी ऑनलाइन शॉपिंगच्या फसवणूकीत अडकलात किंवा आपल्या जवळचे कोणीतरी  या प्रकारच्या घटनेबद्दल सांगत असेल तर आपण काय करावे हे आपल्याला ठाऊक नसते. या फसवणुकीविरोधात आपण कुठे तक्रार करावी हे माहिती नसते. जर आपण अशा प्रकारच्या गोंधळाच्या स्थितीत अडकले असाल तर आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारच्या फसवणुकीविरोधात तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता. हे अगदी सोपे आहे की आपल्याला त्याबद्दलची सर्व माहिती ऑनलाइन मिळेल.  

यावर काही कायदा आहे का?

अशा कोणत्याही फसवणूकीमुळे त्रस्त असाल तर  ग्राहकांची सुरक्षा आणि हक्क लक्षात ठेवून बरेच कायदे बनविले गेले आहेत. त्यांच्याबद्दल देखील जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. 

- ग्राहक संरक्षण कायदा, १९८६

- माहिती तंत्रज्ञान दुरुस्ती कायदा, २००८

- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन इत्यादींनी बनविलेले बरेच नियम व कायदे हे देखील त्यामध्ये येतात. हे सर्व नियम व कायदे उत्पादने आणि सेवा लक्षात घेऊन बनविण्यात आले आहेत. 
 

कोणत्याही ऑनलाइन वेबसाइटवर फसवणूक झाली असेल तर आपल्याला न्याय मिळवू शकता. आपण ग्राहक न्यायालयात जाऊन आपल्यास झालेल्या फसवणूकीबद्दल सांगितले तर नक्कीच न्याय मिळेल. आपण ग्राहक कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता, त्याव्यतिरिक्त, जर आपणास फोनवरच तक्रार करायची असेल तर आपण अधिकृत टोल फ्री क्रमांक १८००-११-४००० वर कॉल करून देखील आपली तक्रार नोंदवू शकता. तसेच १४४०४ या क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता. जर आपल्याला या क्रमांकावर कॉल करायचा असेल तर आपण फक्त सकाळी ०९:३0 ते सायंकाळी ५:३0 पर्यंतच करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com