आता Google Duoमुळे ग्रुप कॉलिंग होणार सोपं; अँड्रॉइड, आयफोन आणि आयपॅडमध्ये असा करा उपयोग 

google duo
google duo

नागपूर : जग पुढे जातंय तसं टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात उत्क्रांती होत चालली आहे. स्मार्टफोन आणि स्मार्ट डिव्हाईसमुले जग जवळ येत चाललं आहे. अगदी लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या व्यक्तीबरोबरही एका सेकंदात बोलण्याइतकी टेक्नॉलॉजी समोर गेली आहे. त्यात आता कोरोनासारख्या भयंकर महामारीमुळे अनेकांवर घरी राहून काम करण्याची वेळ आली आहे. मात्र यावेळी ऑफिसमधील सहकाऱ्यांशी कनेक्ट होण्यासाठी किंवा ऑफिसच्या मीटिंग घेण्यासाठी अनेक  कंपन्यांनी ग्रुप कॉलिंगची सुविधा आणली. ज्यामुळे एकाच वेळी अनेकजण ग्रुप कॉल करू शकतात किंवा मिटिंग घेऊ शकतात. मात्र Google Duoच्या माध्यमातून तुम्हाला सोप्या पद्धतीनं ग्रुप कॉलिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे या अप्लिकेशनमुळे तुम्ही अँड्रॉइड, आयफोन किंवा आयपॅडमध्येही ग्रुप कॉलिंग करू शकता. पण ही अप्लिकेशन नक्की कशी वापरणार? याचबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये असा करा ग्रुप कॉल 

  • सुरुवातीला 'गूगल प्ले स्टोर' मधून Google Duo ही अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ओपन करा. 
  • यानंतर आपल्या Gmail अकाउंटला Google Duoमध्ये रजिस्टर करा. 
  • जर तुम्हाला ग्रुप तयार करायचा असेल तर स्वाईप अप करून  'create a group'वर क्लिक करा. 
  • तुम्हाला ज्यांच्यासोबत ग्रुप कॉल करायचा आहे अशा ११ जणांची नावं तुम्ही सिलेक्ट करू शकता. 
  • जर तुम्हाला त्यांची नावं दिसत नसतील तर तुम्ही त्यांची नावं 'सर्च बारमध्ये शोधू शकता. 
  • नावं सिलेक्ट केल्यानंतर  'Next वर क्लिक करा आणि ग्रुपला नाव द्या. 
  • यानंतर 'Start'वर क्लिक करा यामुळे ग्रुप कॉलिंग सुरु होईल. 

आयफोन किंवा आयपॅडवर असा करा ग्रुप कॉल 

  • सुरुवातीला 'App Store'मधून Google Duo ही अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ओपन करा.
  • यानंतर तुमचं Gmail अकाउंट त्यावर रजिस्टर करून घ्या.
  • स्वाईप अप करून  'create a group'वर क्लिक करा ज्यामुळे तुम्ही ग्रुप तयार करू शकाल.
  • यानंतर ११ जणांचा ग्रुप तुम्ही तयार करू शकता.
  • ज्यांना तुम्ही ग्रुपमध्ये add करू इच्छिता त्यांचं नाव सर्च बारमध्ये शोधा.
  • यानंतर  'Video Call'च्या बटनवर क्लिक करा. तुमचा ग्रुप कॉल सुरु होईल.
  • यानंतर तुम्ही  Duo app ओपन कराल तेव्हा तुम्ही सहजपणे ग्रुप कॉलिंग करू शकता. 

डेस्कटॉपवर ग्रुप कॉलची सुविधा?

डेस्कटॉपवर Google Duo च्या माध्यमातून ग्रुप कॉल करण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र तुम्ही कुठल्याही एका व्यक्तीसोबत Google Duoवर बोलू शकता. यासाठी तूम्हाला तुमच्या ब्राऊझरवर  Google Duo सर्च करून त्यावर तुमचं Gmail अकाउंट रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुम्ही कुठ्लऊही एका व्यक्तीचं नाव शोधून त्यांच्याशी बोलू शकता. त्यासाठ तुम्हाला 'कॉल'च्या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं तुम्ही डेस्कटॉपवर कॉल करू शकाल.  

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com