Signalचे डिफॉल्ट स्टिकर्स कंटाळावाणे वाटतायत? तर असे डाउनलोड करा नवे स्टिकर्स

know how to download and create stickers in new signal Marathi Article
know how to download and create stickers in new signal Marathi Article

स्टिकर्स वापरुन आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांबद्दल आपल्या भावना व्यक्त करणे हे सर्वात लोकप्रिय फिचर आहे. लोक संदेश पाठवण्यासाठी वेगवेगळे स्टिकर्स सर्रास वापरतात. पण मागच्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे आपण ते अ‍ॅप वापरणे बंद केले असेल आणि नवे आलेले  सिग्नल हे मेसेजिंग अ‍ॅप वापरणे सुरु केले असल्यास तुम्हाला त्या मजेदार स्टिकर्सची कमतरता नक्कीच जाणवत असेल. पण या आडचणीवर एक तोडगा आहे. आज आम्ही तुम्हाला सिग्नल अ‍ॅपवर नवीन स्टिकर्स डाउनलोड करण्याचा मार्ग सांगणार आहोत. यानंतर तुम्ही  Android, किंवा iOS या दोन्ही डिव्हाइसवर स्टिकर्स डाउनलोड करु शकाल. 
  
सिग्नलवर स्टिकर्स कसे शोधाल?

सिग्नल अ‍ॅपवर नवीन स्टिकर्स कसे डाउनलोड करावे? ही माहिती देण्यापूर्वी, अ‍ॅपवर या स्टिकर्समध्ये कसे प्रवेश करायचा ते जाणून घेऊयात..

Android साठीची पद्धत

- सर्व प्रथम Signal अ‍ॅप उघडा. आता ज्याला आपणास स्टिकर पाठवायचे आहे ते चॅट उघडा.
- आता चॅटबॉक्समधील इमोजी आयकॉनवर क्लिक करा.
- येथे आपणास इमोजी बटनच्या पुढे स्टिकर बटण दिसेल. या बटणावर क्लिक करा, आपल्याला येथे आधीपासूनच उपलब्ध असलेले दोन डीफॉल्ट स्टिकर पॅक सापडतील.
- स्टिकर आयकॉनवर टॅप केल्यानंतर, चॅटबॉक्स वर इमोजी आयकॉन स्टिकर आयकॉन मध्ये त्यावर क्लिक करुन तुम्हाी पाठवू इच्छित असलेले कोणतेही स्टिकर पाठवू शकता.
 
iOS साठीची पद्धत

- सर्व प्रथम Signal हे अ‍ॅप उघडा. आपणास स्टिकर पाठवायचा आहे त्या चॅट उघडा 
- आता चॅटबॉक्समध्ये उजवीकडे असलेल्या स्टिकर चिन्हावर क्लिक करा.
- यानंतर आपण एका टॅपसह सर्व स्टिकर्स वापरू शकता.
 
 येथे करा स्टिकर डाउनलोड ..

signalstickers.com एक विनामूल्य  थर्ड पार्टी कलेक्शन आहे जो Signal अ‍ॅपसाठी स्टिकर पुरवते. 

स्मार्टफोनवर स्टिकर कसे डाउनलोड करावे? 
 
Android साठीची पद्धत

- सर्व प्रथम आपल्या ब्राउझरमध्ये signalstickers.com उघडा आणि स्टिकर पॅक निवडा.
- आता अ‍ॅड टू Signal वर क्लिक करा आणि मग इन्स्टॉल करा.

यानंतर, आपल्याला प्रॉम्प्ट दिसेल, जो आपल्याला Signal उघडण्यास सांगेल. आता जेव्हा आपण स्टिकर चिन्हावर क्लिक कराल तेव्हा आपोआपच अ‍ॅड केलेले स्टिकर दिसतील.

 
iOS साठीची पद्धत

- सर्व प्रथम,आपल्या ब्राउझरमध्ये signalstickers.com  उघडा आणि स्टिकर पॅक निवडा.
- आता Android प्रमाणेच येथे तुम्हाला अ‍ॅड टू सिग्नल वर टॅप करावे लागेल.

हे आपोआप आपल्या signal अ‍ॅपवर स्टिकर पॅक जोडेल.

याशिवाय आपण #makeprivacystick हॅशटॅग वापरुन ट्विटरवर शोधू शकता आणि येथे आपल्याला एकाच ठिकाणी नव-नवीन स्टिकर्स सापडतील. त्यानंतर आपण ट्विटममधील लिंकवर क्लिक करुन स्टिकर इंस्टॉल करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com