QR कोड वापरुन शेयर करा वाय-फाय पासवर्ड, जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wi fi

आज आपण तुमचा Wi-Fi पासवर्ड शेयर करण्याचा अगदी सोपा मार्ग सांगत आहोत. या पध्दतीने आपण आपला वायफाय कोणालाही सहजपणे देऊ शकाल आणि तुम्हाला पासवर्ड सांगण्याची गरजही पडणार नाही.

QR कोड वापरुन शेयर करा वाय-फाय पासवर्ड, जाणून घ्या सविस्तर

बर्‍याच वेळा असे होते की इंटरनेट वापरण्यासाठी आपण आपला Wi-Fi पासवर्ड इतरांना देतो. परंतु कधीकधी पासवर्ड खूप मोठा आणि लक्षात ठेवायला अवघड असल्यामुळे तो सहज शेयर करणे शक्य नसते. तुम्हाला देखील असा लांबच लांब पासवर्ड दुसऱ्या कोणाला देताना अवघड जात असेल तर आज आपण तुमचा Wi-Fi पासवर्ड शेयर करण्याचा अगदी सोपा मार्ग सांगत आहोत. या पध्दतीने आपण आपला वायफाय कोणालाही सहजपणे देऊ शकाल आणि तुम्हाला पासवर्ड सांगण्याची गरजही पडणार नाही. (know how to connect wifi password with qr code)

जर आपण सॅमसंग स्मार्टफोन वापरत असाल तर ते आपल्यासाठी खूप सोपे होईल. कारण, क्यूआर कोडच्या मदतीने आपण सहजपणे स्कॅन करू शकता आणि ऑटोमॅटीकली नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकता. आपण सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 9 Pie किंवा त्यापेक्षा अधिकचे वर्जन वापरत असल्यास, आपण वाय-फाय पासवर्ड कसा शेयर करू शकता ते पाहाणार आहोत

क्यूआर कोडद्वारे वाय-फाय कनेक्ट कसे करावे

  • सर्व प्रथम, आपल्याला आपल्या फोनवर सेटिंग्ज अॅप उघडावे लागेल.

  • पुढे कनेक्शन अॅपवर टॅप करा. मग आपल्याला वाय-फाय वर क्लिक करावे लागेल.

  • हे लक्षात ठेवा की ते डब्ल्यूपीए, डब्ल्यूपीए-पीएसके किंवा डब्ल्यूईपी द्वारे प्रोटेक्ट केले जाणे आवश्यक आहे.

  • त्यानंतरच आपल्याला ज्या डिव्हाइससोबत इंटरनेट शेयर करायचे आहे त्याच्याशी वाय-फाय नेटवर्क कनेक्ट करावे लागेल.

  • शेवटचे म्हणजे कनेक्ट केलेल्या नेटवर्कच्या उजव्या बाजूला गिअर चिन्हावर टॅप करणे.

  • आता स्क्रीनच्या तळाशी एक QR कोड टायटल असलेले एक चिन्ह दिसेल आपल्याला त्यावर टॅप करावे लागेल आणि स्क्रीन आपोआप ब्राइट होईल

  • आता आपल्याला क्यूआर कोड दिसेल जो वापरुन तुम्ही इंटरनेट शेयर करु शकता.

(know how to connect wifi password with qr code)

हेही वाचा: आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर

loading image
go to top