esakal | आता WhatsApp वर मॅसेज करा शेड्यूल, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

whatsapp introduced covid 19 sticker pack know what is special in it Marathi article

आता WhatsApp वर मॅसेज करा शेड्यूल, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर तुम्हाला तुमच्या मित्राला रात्री बारा वाजता मॅसेज पाठवायचा असेल तर यासाठी तुम्हाला रात्री उशीरापर्यंत जागे राहावे लागते. जे बर्‍याच लोकांसाठी त्रासदायक असू शकते. पण आज आपण व्हॉट्सअॅपच्या अशा टिप्सविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मेसेजेस शेड्यूल करू शकाल आणि रात्री 12 वाजेपर्यंत जागे राहण्याची गरज भासणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज शेड्यूल करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरकडून वेगळा मेसेज इन्स्टॉल करावा लागेल, ज्याचे नाव SKEDit असे आहे. ते गुगल प्लेस्टोअरवर फ्री उपलब्ध आहे. यानंतर, साइनअप करावे लागेल. आपल्याला व्हॉट्सअॅप पर्यायावर टॅप करावे लागेल. ते आपल्याला व्हॉट्सअॅपची काही परवानगी विचारते. यानंतर Enable Accessbility वर क्लिक करा आणि Use Service वर टॅप करा. यानंतर, ज्याला शेड्यून मॅसेज पाठवायता आहे त्याचे नाव टाइप करा आणि संदेश टाइप करा. यानंतर, वेळ सेट करण्याचा एक पर्याय दिसेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन बर्थ डे स्पेशल स्टिकर्स

जर तुम्हाला वाढदिवसाच्या मॅसेजमध्ये जुने स्टिकर्स पाठवण्याची कंटाळा आला असेल आणि आता काहीतरी नवीन करून पाहायचे असेल तर आपण गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन काही नवीन स्टिकर्स जोडू शकता. यासाठी आपल्याला चॅट बॉक्समध्ये जावे लागेल आणि नंतर इमोजी आयकॉनवर क्लिक करा आणि स्टिकर्स ऑप्शनवर जा आणि नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करा. आपण गुगल प्लेस्टोअरवर जाऊन आपला आवडता स्टिकर पॅक डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त, आपण gettickerpack.com / stkers/happy-birthday या लिंकवर जाऊन देखील डाऊनलोड करु शकता.

व्हॉट्सअ‍ॅपवर स्वत: चे स्टिकर तयार करा

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते त्यांना हवे असल्यास इतरांपेक्षा पुर्णतः वेगळे स्वत: चे स्टिकर तयार करू शकतात. यासाठी, वापरकर्त्यांनी प्रथम व्हाट्सएप अॅपसाठी स्टिकर मेकर डाउनलोड करणे आवश्यक आहे, जी गुगल प्लेस्टोअरवर सहज सापडेल. यानंतर यूजर्स अ‍ॅप इंस्टॉल करा आणि नवीन स्टिकर पॅक तयार करा वर क्लिक करा. यासाठी तुम्हाला नाव टाईप करावे लागेल. आता अ‍ॅड स्टिकरच्या चिन्हावर क्लिक करा आणि स्वतःचे स्टिकर तयार करा. यासाठी आपण आपल्या गॅलरीमधून एक आवडता फोटो निवडू शकता.