तुमचा फोन सतत हँग होतोय? या काही बेसिक सेटिंग सोडवतील प्रॉब्लेम

Mobile Hanging problem
Mobile Hanging problemesakal

Mobile Hanging Problem Solution : आजकाल बाजारात अनेक दमदार प्रोसेसर आणि स्टोरेज असलेले फोन उपलब्ध आहेत, परंतु जर तुम्ही जुना फोन वापरत असाल आणि तो जर सतत हँग (Mobile Hanging) होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण पाच ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्या वापरुन तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची स्पिड (Mobile Speed) वाढवू शकता. या ट्रिक्स वापरल्यानंतर तुमचा फोन अगदी व्यवस्थित चालू लागेल.

फोनवरून गरज नसलेल्या सर्व गोष्टी डिलीट करा ज्यांची तुम्हाला गरज पडत नाही. याशिवाय फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेजवर (Storage) क्लिक करा, खाली कॅशे डेटाचा पर्याय येतो, तोही क्लिअर करा. हे वेळोवेळी केले पाहिजे. अँड्रॉइड फोन युजर्स (Android Phone) हे सहज करू शकतात.

तुमच्या फोनमध्ये खूप जास्त अॅप्स असल्यास, तुम्ही त्यातील काही एक्सटर्नल मेमरीमध्ये ट्रान्सफर करु शकता जेणेकरुन तुमचा फोन व्यवस्थित चालण्यास मदत होईल आणि तुमच्या फोनच्या इंटरनल मेमरीमध्ये स्पेस शिल्लक राहील. तुम्हाला हवे असल्यास, अॅप इंस्टॉल करताना ते थेट एक्सटर्नल मेमरीमध्ये सेव्ह करा. त्यासाठी सेटिंग्जमध्ये जा आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये जाऊन, तेथे SD कार्डचा पर्याय निवडा. ही सुविधा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या फोनमध्ये दोन्ही मेमरी आहेत.

फोनमधील गाणी, व्हिडिओ, फोटो आणि इतर डेटा केवळ एक्सटर्नल मेमरीमध्ये सेव्ह करा. ते इंटरनल मेमरी मधून एक्सटर्नल मध्ये ट्रांसफर करा. जर तुम्ही एक्सटर्नल मेमरी डिफॉल्ट मेमरी म्हणून निवडली तर ती आपोआप तिकडे सेव्ह केले जातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा हे काम करावे लागणार नाही.

Mobile Hanging problem
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप युजर्ससाठी अलर्ट! वेळीच व्हा सावध..

फॅक्टरी रीसेट हा ऑप्शन इतर सर्व पर्याय वापरुन झाल्यानंतरच वापरा. यामुळे आवश्यक नसलेल्या वेबसाइट्स, अॅप्स आणि ब्राउझरमधून येणारा सर्व डेटा काढून टाकला जाईल. हे सर्व अॅप्स, फोन नंबर, फोटो, गाणी काढून टाकते त्यामुळे, हा ऑप्शन वापरताना काळजी घ्या, तुम्ही फॅक्टरी रिसेट करणार असाल तर सर्व काही आधी कुठेतरी सेव्ह करणे चांगले राहील. तुम्ही हा डेटा SD कार्डवर ट्रान्सफर करु शकता.

फोनसोबतच तुमचा सर्व महत्त्वाचा डेटा ईमेल, गुगल ड्राइव्ह किंवा क्लाउडवर सेव्ह करत रहा. त्यामुळे हा डेटा आयुष्य भरासाठी सुरक्षित असेल आणि फोन खराब झाला किंवा चुकून काहीतरी डिलीट झाले तर काळजी करण्याची काहीच गरज राहाणार नाही.ड्राइव्हवर सेव्ह केल्यानंतर तो डेटा फोनमधून काढून टाका जेणेकरून मेमरीमध्ये स्पेस राहील.

Mobile Hanging problem
Airtel vs Jio vs Vi चे नवीन प्रीपेड प्लॅन; मिळतेय 84 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com