Live Location: तुमची गर्लफ्रेंड या क्षणी काय करतीये? जाणून घ्या ट्रॅक करण्याची सोपी ट्रिक

तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मित्र-मैत्रिणींचे लाइव्ह लोकेशन जाणून घेऊ शकता. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगल मॅप्समध्ये खास फीचर देण्यात आले आहे.
Live Location
Live LocationSakal

Live Location Tracking Features: मित्र-मैत्रिणी काय करत आहेत किंवा सध्या कुठे आहेत, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. अनेकजणांना गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडचे लोकेशन देखील जाणून घ्यायचे असते. या फीचरबाबत माहिती नसल्याने लोकेशन जाणून घेता येत नाही. परंतु, आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणाचेही लाइव्ह लोकेशन जाणून घेऊ शकता. हे खास फीचर टेक कंपनी गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅप उपलब्ध करते.

मित्र-मैत्रिणी अथवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे लोकेशन जाणून घेण्यासाठी त्यांचा मोबाइल डेटा, वाय-फाय ऑन असणे गरजेचे आहे. याशिवाय, जीपीएस देखील सुरू असावे. हे फीचर बंद असल्यास तुम्ही लाइव्ह लोकेशन बंद करू शकता. मात्र, यासाठी तुम्ही मित्र-मैत्रिणींची परवानगी घ्यायला हवी.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Google Maps च्या मदतीने मिळेल लाइव्ह लोकेशनची माहिती

कोणाचेही लाईव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी तुम्हाला Google Maps ची मदत घ्यावी लागेल. कंपनी या अ‍ॅपसोबत लाइव्ह लोकेशन शेअरिंगची सुविधा देत आहे. या फीचरचा उपयोग खासकरून सुरक्षेच्या दृष्टीने केला जातो. Google Maps वरून लोकेशन शेअर करण्यासाठी तुम्हाला मित्राच्या फोनमध्ये अ‍ॅप ओपन करावे लागेल, यानंतर लोकेशन शेअरिंग पर्यायावर जा. यानंतर मित्राचे लोकेशन ईमेल अथवा मेसेजवरून शेअर करा. तुम्ही मित्र-मैत्रिणींकडे देखील त्यांचे लोकेशन मागू शकता.

Live Location
Smartphone Offer: मस्तच! तब्बल ७ हजार रुपये स्वस्तात मिळतोय Realme चा दमदार ५जी स्मार्टफोन, पाहा ऑफर-फीचर्स

WhatsApp ची घेऊ शकता मदत

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर देखील लाइव्ह लोकेशन शेअर फीचर उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला मित्र-मैत्रिणी अथवा गर्लफ्रेंडच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावे लागेल. येथे तुम्हाला लोकेशनचा पर्याय दिसेल. आता लाइव्ह लोकेशनचा पर्याय निवडा. तुम्ही ठराविक कालावधीसाठी देखील लोकेशन शेअर करू शकता. तुम्ही मित्राच्या फोनवरून स्वतःला लाइव्ह लोकेशन शेअर करू शकता. याद्वारे मित्र-मैत्रिणी कोठेही गेले तरीही सहज ट्रॅक करू शकता. मात्र, लक्षात घ्या की कोणाचेही लोकेशन ट्रॅक करण्याआधी त्यांची परवानगी नक्की घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com