esakal | Google Chrome मध्ये मेमरीज फीचर करा ऑन, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

google chrome

बरेच जण सध्या गुगल क्रोम हे ब्राऊजर वापरतात या ब्राऊजरमध्ये एक हिस्ट्री फीचर देण्यात आलेले आहे ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून उघडलेली सर्व वेब पेज संग्रहित केली जातात. आता गुगल त्यामध्ये मेमरीज या फीचरची भर टाकणार आहे.

Google Chrome मध्ये मेमरीज फीचर करा ऑन, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बरेच जण सध्या गुगल क्रोम हे ब्राऊजर वापरतात या ब्राऊजरमध्ये एक हिस्ट्री फीचर देण्यात आलेले आहे ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून उघडलेली सर्व वेब पेज संग्रहित केली जातात. आता गुगल त्यामध्ये मेमरीज या फीचरची भर टाकणार आहे. (know how to use google chrome history feature changed to memories)

मेमरीज हे एक प्रकारे हिस्ट्रीचाच भाग आहेत, परंतु त्या थोड्या अधिक व्यवस्थित आणि संयोजित पध्दतीने दिलेल्या असतील. यामध्ये फक्त वेब पेजची हिस्ट्रीच सुरक्षित केली जाणार नाही तर यात अनेक बर्‍याच गोष्टी संग्रहित होतात. जेव्हा वापरकर्त्यांते त्यांच्या कामाचे टॅब ग्रुप आणि वैयक्तिक खात्यावर स्विच करतात तेव्हा ते सेव्ह केले जाते. तुम्हाला Google Chrome वर मेमरी फीचर इनेबल करायचे असल्यास तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

मेमरीज फीचर करा ऑन

या प्रक्रियेसाठी सर्वप्रथम आपल्याकडे गूगल क्रोमची लेटेस्ट अपडेट असणे आवश्यक आहे. सगळ्यात आधी कंप्युटरवर क्रोम वेब ब्राऊजर उघडा.

आता आपल्याला अ‍ॅड्रेस बारमध्ये Chrome: //flags#memories टाइप करा. प्लॅग मेनूमधील मेमरी फंक्शनच्या पुढे ड्रॉप डाऊन वर क्लिक करा आणि एनेबल हा पर्याय निवडा.

त्यानंतर Chrome ब्राउझर पुन्हा लॉन्च करण्यास सांगेल. आता आपल्याला रीलाँच बटणावर क्लिक करावे लागेल.

या प्रक्रियेनंतर, सिस्टममधील मेमरी फंक्शन एनेबल केले जाईल.

हे नवीन फीचरफीचर Mac, Window, Linux, Chrome OS आणि Android यासह सर्व प्लॅटफॉर्मवर काम करते.

हेही वाचा: फेसबुकनंतर आता 'गुगल'ही राजी; सरकारचे नियम मान्य

जगात गूगलचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. आपल्या वापरकर्त्यांचे आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी कंपनी नवीन फीचर्स आणत आहे. अलीकडे एक नवीन ऑप्शन जोडला, ज्याला क्विक डीलीट असे म्हटले जाईल. याद्वारे वापरकर्ते शेवटच्या 15 मिनिटांची हिस्ट्री त्यांच्या Google खात्याच्या मेनूमधून एकाच टॅपवर डिलीट करु शकतील. या व्यतिरिक्त Google एक फीचर लॉन्च करेल, ज्यामध्ये Google फोटोंमध्ये एक पासकोड-संरक्षित लॉक फोल्डर जोडला जाईल. याला लॉक्ड फोल्डर असे नाव दिले जाईल. हे स्वतंत्रपणे निवडल्या जाणार्‍या फोटोचे संरक्षण करेल. कंपनीने म्हटले आहे की वापरकर्त्यांना त्यांच्या ग्रीड किंवा शेयर्ड अल्बममधून स्क्रोल करताना त्यांचे हे फोटो दिसत नाहीत.

व्यतिरिक्त, कंपनीने पिक्सल 3 मालिकेतील फोनAsus, OnePlus, Oppo, Realme, Tecno, Sharp, TCL, Xiaomi, vivo आणि ZTE सादर केले आहेत. Google I / O 2021 इव्हेंटमध्ये, Google ने Google Photos मधील एआय आधारित फीचरसह स्मार्ट अपग्रेड केली आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना नॉस्टेलगिक फिल मिळेल. पूर्वीच्या तुलनेत या वेळी मेमरीज वर अधिक लक्ष देण्यात आले आहे. याशिवाय प्रोटेक्शन और प्राइवेसीशी संबंधित नवीन गोष्टीही समोर आल्या आहेत. गुगलने नवीन Wear OS देखील सादर केला आहे, जो पूर्वीपेक्षा एफिशीयंट आणि कार्यक्षम आहे.

(know how to use google chrome history feature changed to memories)

हेही वाचा: Truecaller ला टक्कर देणार गुगल फोन अ‍ॅप, जाणून घ्या फीचर्स