esakal | काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर?.. जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या खास गोष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

know the interesting things about mosquitos

पृथ्वीवर तब्बल १२० लाख कोटी डास आहेत. आतापर्यंत जगभरात तब्बल ४२ अब्ज लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला आहे. साल २००० पासून डासांबाबतच्या संशोधनासाठी जगभरात तब्बल ४० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत.

काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर?.. जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या खास गोष्टी

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : पावसाळ्यात जागोजागी पाणी साचल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. डासांमुळे अनेक जीवघेणे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया यासारखे रोग डासांच्या चावण्यामुळे पसरतात. मात्र यासाठी आता बाजारात निरनिराळ्या प्रकारचे डास मारण्याचे  औषध  उपलब्ध आहेत. मात्र शेकडो वर्षांपूर्वी जर्मनीने हेच लहान दिसणारे डास युद्धात शस्त्र म्हणून वापरले होते हे तुम्हला माहिती का? आज आम्ही तुम्हाला अशाच डासांबद्दलच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. 

पृथ्वीवर तब्बल १२० लाख कोटी डास आहेत. आतापर्यंत जगभरात तब्बल ४२ अब्ज लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला आहे. साल २००० पासून डासांबाबतच्या संशोधनासाठी जगभरात तब्बल ४० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. तसेच डासांना मारणारे मलम, क्रीम, मशीन आणि कांडी यामागे तब्बल १० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. 

डासांनी घेतला आहे डायनासोरचा चावा 

तब्बल १९ कोटी वर्षांपासून डास पृथ्वीवर आहेत. विशेष म्हणजे डायनासोरसारख्या अतिभयंकर प्राण्यालासुद्धा डासांनी चावा घेतला आहे. म्हणजेच डायनासोरच्या आधीपासूनच डास पृथ्वीवर आहेत. 

कोणत्या ब्लडग्रुपच्या लोकांना जास्त डास चावतात? 

आपल्याला नेहमी मादी डास चावतात नर डास चावत नाहीत म्हणजेच रक्त पित नाहीत हे तुम्हाला माहितीच असेल. मात्र काही विशेष ब्लूडग्रुपच्या लोकांना जास्त डास चावतात. O ब्लूडग्रुप असणाऱ्या लोकांना A आणि B ब्लूडग्रुपच्या लोकांच्या तुलनेत सर्वाधिक डास चावतात. तसेच अति परफ्युम लावणारे लोकं, अति बियर पिणारे लोकं आणि व्यायाम करून अति घाम ;आलेल्या लोकांनाही जास्त डास चावतात. 

गरोदर महिलांना चावतात जास्त डास 

हो. हे खरे आहे. गरोदर महिलांच्या शरीरातून इतरांपेक्षा तब्बल २० टक्के कार्बन डायऑक्साईड बाहेर निघत असतो. या कार्बनडाय ऑक्साईडचा गंध डासांना आकर्षित करतो. म्हणून गरोदर महिलांना सर्वाधिक डास चावतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. 

अलेक्झांडरचा मृत्यूही डासांमुळेच

जगज्जेता अलेक्झांडरला  युद्धाच्या वेळी डास चावला . यामुळे त्याला मलेरिया झाला. त्यात तो तापाने आणि अंगदुखीने फणफणला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे डास हे लोकांच्या मृत्यूचे मुख्य कारण होते. 

जर्मनीने युद्धात केला होता डासांचा वापर 

१९४४ साली जर्मनीने मित्र राष्ट्रांच्या फौजांना रोखण्यासाठी आणि इटालियन जनतेला अद्दल घडवण्यासाठी डासांचा वापर केला होता. याबद्दलचे आदेश खुद्द हिटलरने दिले होते. नागरिकांकडून आणि फौजांकडून डासांपासून संरक्षण  करणाऱ्या जाळ्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर युद्धभूमीवर लहान लहान तळे बनवण्यात आले. या तळ्यांमध्ये डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होईल याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. फवारणी होऊ नये म्हणून तळ्यांच्या आजूबाजूला बॉम्ब पेरण्यात आले. त्यामुळे तब्बल ५० ते ६० हजार सैनिकांना मलेरियाची लागण झाली अमी त्यातच अनेकांचा मृत्यू झाला. 

कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. मात्र याआधीचे कित्येक वर्ष डासांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला आहे. त्यामुळे तुम्हालाही डासांपासून काळजी घेण्याची गरज आहे.   
     

loading image
go to top