Paytm वर चेक करा तुमचा सिबिल स्कोअर; फॉलो करा 'या' टीप्स

सिबिल स्कोअर म्हणजे काय माहित आहे का?
paytm
paytm

कोणत्याही कारणासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर प्रथम तुमचा सिबिल स्कोअर (Cibil score) तपासला जातो. जर, तुमचा सिबिल स्कोअर (Cibil score) चांगला असेल तर कर्ज मिळण्यास अधिक सुलभता होते. विशेष म्हणजे सिबिल स्कोअर चांगला असणं म्हणजे तुम्ही तुमच्या कर्जाची (Loan) परतफेड किंवा क्रेडिट कार्डचं (Credit Card) पेमेंट वेळात करत आहात. पण, आपला सिबिल स्कोअर (Cibil score) किती आहे हे अनेकांना माहित नसतं. म्हणूनच आपला सिबिल स्कोअर (Cibil score) कसा चेक करायचा ते जाणून घेऊयात.(know paytm credit score within minutes use these easy tips)

सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट ऑनलाइन होत असल्यामुळे आपला सिबिल स्कोअरदेखील (Cibil score) आपल्याला घरबसल्या सहज चेक करता येतो. विशेष म्हणजे जे पेटीएम यूज करतात त्या वापरकर्त्यांना त्यांचा क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासता येतो.

paytm
Expert Advice : वर्कआऊट करतांना मास्क लावणं योग्य की अयोग्य?

अशा पद्धतीने चेक करा तुमचा स्कोअर

१. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्यांनी आपल्या स्मार्टफोनवर पेटीएम ओपन करा

२. त्यानंतर माय पेटीएमवर दिलेल्या सर्व सेवांवर क्लिक करा.

३. सगळ्या सेवांवर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला कर्ज व क्रेडिट कार्ड असा एक ऑप्शन दिसेल.

४. कर्ज व क्रेडिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फ्री क्रेडिट स्कोअरचा एक नवीन ऑप्शन दिसेल.

५. या नव्या ऑप्शनवर तुमची काही ठराविक माहिती विचारली जाते. ती माहिती व्यवस्थित भरा.

६. जर तुम्ही पहिल्यांदाच पेटीएमच्या माध्यमातून क्रेडिट स्कोअर चेक करत असाल तर फ्री क्रेडिट स्कोअरवर माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी रजिस्टर क्रमांक येईल.

७. हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा क्रेडिट (सीआयबीआयएल) स्कोअर मिळेल.

सिबिल स्कोअर म्हणजे काय?

सिबिल स्कोअरच्या (Cibil score) माध्यमातून तुम्हाला तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची (Credit History) माहिती मिळते. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान चेक केला जातो. ३०० स्कोअर सर्वात कमी असण्याचं लक्षण आहे. तर, ९०० म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे. त्यामुळे बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूपच महत्व आहे.

दरम्यान,सिबिल स्कोअर हा ट्रान्स युनियन सिबिल लिमिडेटद्वारे तयार केला जातो. या पूर्वी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जात होते. ज्यावेळी आपल्याला गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तेव्हा बॅंकेकडून हा स्कोअर चेक केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com