
पुणे : जगभरात गुगल क्रोम ब्राउझरचा यूजरबेस हा 63 टक्के इतका मोठा आहे. यावरुन लक्षात येते की जगभरात मोबाईल फोन आणि कंप्यूटर या दोन्हीसाठी हे ब्राउजर सर्रास वापरले जाते. तुम्हाला कदाचीत माहिती नसेल पण क्रोम हे ब्राउझर फक्त ब्राउझिंगसाठीच वापरतात असे नाही. तर या ब्राउझरमद्ये इतरही अनेक उपयोगी फिचर्स देण्यात आले आहेत. जसे की हे ब्राउझर वापरत असताना यामध्ये तुम्ही याचा कॅल्क्युलेटर आणि पीडीएफ रीडर म्हणून देखील वापर करु शकता. इतकेच नाही तर यामध्ये तुम्हाला डाटा सेव्हर मोड देखील देण्यात येतो.
डाटा सेवर मोड
Google Chrome Browser मधील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात इंटरनेट डाटा सेव्ह करता येतो. बर्याचदा आपल्याला फोनचा इंटरनेट डाटा वाचवायचा असतो जेणेकरुन दुसरीकडे इतर कामांसाठी वापरला जाऊ शकेल. अशा स्थितीत अँड्रॉइड फोनवर क्रोम ब्राउझर अॅप उघडा. यानंतर, उजवीकडील तीन डॉट्स वर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्ज वर जा आणि तेथील लाईट या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर, जर लाईट मोडचा पर्याय बंद असेल तर तो चालू करा. यामुळे तुमचा इंटरनेट डाटा वाचेल इतकेच नाही तर तुम्ही आलेखाच्या मदतीने सेव्ह केलेला डाटाही किती आहे ते देखील पाहू शकता.
पीडीएफ रीडरची गरज नाही
पीडीएफ फाइल किंवा ई-बुकला लॅपटॉप, संगणक किंवा फोनमध्ये वाचण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये पीडीएफ रीडर असणे आवश्यक आहे. पण तुम्ही क्रोम वापरत असाल तर त्यामध्येच पीडीएफ फाइल उघडू शकता. यासाठी पीडीएफ फाइल अॅड्रेस बारवर ड्रॅग करा आणि ती सोडा. यानंतर ब्राउझरमध्येच पीडीएफ फाईल उघडेल.
क्रोमच कॅल्क्यूलटरचे काम करेल
Google Chrome ब्राउझरमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकार या गणिती क्रिया करणे अत्यंत सोपं आहे. कॅल्क्युलेटर किंवा कन्व्हर्टर वापरण्यासाठी आपल्याला आपल्याला अंक थेट सर्चबारमध्ये टाइप करावे लागतील. उदाहरणार्थ आपल्याला 4 आणि 9 यांची बेरीज करायची असेल तर सर्च बारवर जा आणि 4 + 9 थेट टाइप करा त्यांनंतर तुम्हाला अंकाची बेरीज मिळून जाईल. जर तुम्हाला किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतरित करायचे असल्यास, 4 km to m टाइप करा, आपल्याला उत्तर मिळेल.
Google Chrome Browser मध्ये फाइल शोधा
तुमच्या कंप्यूटरमध्ये सेव्ह केलेली कोणतीही फाइल शोधण्यासाठी आपल्याला माय कॉम्प्यूटरवर जावे लागेल. यानंतर, शोध घेऊन किंवा एकामागून एक ड्राइव्ह तपासावी लागेल. पण आपण फाईल फाइंडर म्हणून देखील Chrome ब्राउझर वापरू शकता. यासाठी अॅड्रेस बारमध्ये तुम्हाला file:///C:/ टाईप करावे लागेल. आपण सी ड्राइव्हच्या जागी कोणतीही दुसरी विशेष ड्राइव्ह देखील ठेवू शकता. नंतर एंटर क्लिक करा, त्यानंतर ती ड्राइव्ह उघडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.