आता तुमचा स्मार्टफोन घेईल तुमच्या आरोग्याची काळजी, कसे? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

know some smartphone features which help to keep you healthy marathi article

ज्या लोकांना त्यांचे दररोजचे रुटीन सांभाळणे शक्य होत नाही, स्वतःच्या सवयी आड  येतात अशा मंडळींसाठी स्मार्टफोन मदत करु शकतो. आजकाल स्मार्टफोनमध्ये असे अनेक फिचर्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे फिटनेस सांभाळू शकता. आज आपण अशाच काही स्मार्ट फीचर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

आता तुमचा स्मार्टफोन घेईल तुमच्या आरोग्याची काळजी, कसे? वाचा सविस्तर

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज वाढली आहे. मात्र, आजकाल स्वतःसाठी वेळ काढणे बऱ्याच जणांना शक्य होत नाही. दरवर्षी लोक नव्या वर्षाच्या सुरुवातीला  वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी संकल्प करतात, पण त्यांचे प्रयत्न बऱ्याचदा कमी पडतात आणि व्यायमाची सवय राहात नाही. ज्या लोकांना त्यांचे दररोजचे रुटीन सांभाळणे शक्य होत नाही, स्वतःच्या सवयी आड  येतात अशा मंडळींसाठी स्मार्टफोन मदत करु शकतो. आजकाल स्मार्टफोनमध्ये असे अनेक फिचर्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे फिटनेस सांभाळू शकता. आज आपण अशाच काही स्मार्ट फीचर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

एक्टिवीटी ट्रॅकर (Activity Tracker)

तंदरुस्त राहण्यासाठी जीम जाण्याखेरीज दुसरा सोपा पर्याय नाही का?  तर आहे. तुम्ही दररोज नियमीत अंतर चालण्याचा व्यायम केला तरी देखील तुम्ही तंदरुस्त राहू शकता. त्यासाठी तुम्हाला दररोज स्वतःसाठी चालण्याचे टारगेट ठरवून तेवढे अंतर पुर्ण करणे गरजेते आहे. तुम्ही दिवसात किती किलोमीटर चाललात याचे मोजमाप स्मार्टफोन ठेवेल. असे बऱ्याच कंपनीचे स्मार्टफोन स्टेप काऊंट करणारे फीचर त्यांच्या फोनमध्ये देतात. जसे की, सॅमसंग कंपनीच्या फोनमध्ये सॅमसंग हेल्थ हे अॅप तुम्हाला सुरु करावे लागेल, तर ओप्पो या कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये स्मार्ट असिस्टंटच्या मदतीने तुम्ही हे फीचर सुर करु शकता.

डिजीटल वेलबींग (Digital Wellbeing)

बऱ्याचदा आपण दिवसभरात फोन वापरण्यात किती वेळ घालवतोय हे आपल्याच लक्षात येत नाही. पण फोनचा वापर वाढला की तेवढा वेळ आपण कसलीही शारीरीक हलचाल करत नाही.  त्यामुळे मधुमेह, ऱ्हदयरोग असे आजार बळावण्याची शक्यता असते. त्यासाठी फोनमध्ये डिजीटल वेलबींग (Digital Wellbeing) हे फीचर देण्यात येते. या फीचरमुळे आपण कोणते अॅप किती वेळ वापरले ते समजते. त्या माहितीवरुन अॅपच्या वापरावर वेळेचे बंधन घालणे शक्य होते. या फीचरमध्ये असलेल्या फोकस मोड ऑन केल्यानंतर सर्व अॅपचे नोटीफिकेशन येणे बंद होते. 

गायडेड ब्रीदिंग (Guided Brithing)

दीर्घ श्वसन हे शरीरासाठी फायद्याचे असते, त्यामुळे तणाव कमी होतो आणि सोबत ब्लड प्रेशर देखील कमी होते. गायडेड ब्रीदिंगसाठी प्ले स्टोअवर असंख्य एप्लिकेशन उपलब्ध आहेत. तसेच बऱ्याच कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये असे एप्लिकेशन आधीच देण्यात आलेले असतात. असे एप्लिकेशन श्वास घेण्याच्या चांगल्या सवयी बद्दल माहिती देतात, तसेच श्वास घेण्याची योग्य पध्दत देखील दाखवतात. 

बेडटाईम मोड (Bedtime Mode)

हे फीचर देखील सर्व स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असते. बऱ्याच जणांना झोपण्याच्या आगोदर फोन पाहण्याची सवय असते. या सवयीचा आपल्या आरोग्य आणि झोपेवर वाईट परिणाम होतो. झोप व्यवस्थित न झाल्याने आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. बेडटाईम मोड ऑन केल्यानंतर हा मोड तुमच्या फोनची स्क्रिन ग्रे रंगाची करतो, ज्यामुळे डोळ्यांवर कमी ताण पडतो सोबतच हा मोड फोनमध्ये तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नोटिफीकेशनला म्यूट करते, ज्यामुळे तुम्ही आरामात झोप घेऊ शकता. 

व्हाईट नॉईस जनरेटर (White Noise Generator)

व्हाईस नॉईस जनरेटर हे फीचरच्या मदतीन तुम्हाला नॅचरल आवाज ऐकवण्यात येतो जेणेकरुन तुमच्या मनाला शांती मिळते आणि तुम्ही गाढ झोपेत जाता. चांगली झोप घेतल्याने तुमचे आरोग्य सुधारते. हे फीचर देखील बऱ्याच स्मार्टफोनमध्ये देण्यात येत आहे. ज्यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंडला वेगवेगळे आवाज सलेक्ट करु शकता आणि गाढ झोपेचा आनंद घेऊ शकता. 

टॅग्स :Diabetes News