
आज आम्ही तुंम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही WhatsApp चा जुन्यातला जुना मेसेज आणि मीडिया फाईल्सही दिलीत करू शकाल.
आता WhatsAppचे काही वर्षांआधी पाठवलेले मेसेजही करा डिलीट; या स्टेप्स नक्की करा फॉलो
नागपूर : WhatsApp आपण सर्वच जण वापरतो. कधी कधी घाईत असल्यामुळे आपण चुकीचा मेसेज चुकीच्या व्यक्तीला किंवा ग्रुपला सेंड करतो. मात्र यासाठी WhatsAppने Delete for Everyone ची सुविधा दिली आहे. यात आपण १ तासाच्या आत चुकून पाठवलेला मेसेज सगळ्यांसाठी डिलीट करू शकतो. मात्र आपण चूक आपल्याला १ तासानंतर लक्षात आली तर? तो मेसेज आपण डिलीट करू शकत नाही. मात्र आज आम्ही तुंम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही WhatsApp चा जुन्यातला जुना मेसेज आणि मीडिया फाईल्सही दिलीत करू शकाल.
फॉलो करा या स्टेप्स
- सुरुवातीला तुम्हाला फोनचे 4 जी नेटवर्क बंद करावे लागेल.
- यानंतर फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. तेथून अॅप सेटिंग्जवर क्लिक करा.
- मॅनेज अॅपवर क्लिक केल्यानंतर बरेच पर्याय दिसतील, जिथून तुम्हाला व्हॉट्सअॅपवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, फोर्स स्टॉपचा पर्याय उपलब्ध आहे. तर ओके वर क्लिक केल्यास व्हॉट्सअॅप बंद होईल.
- यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपचे जे मेसेज किंवा मीडिया फाईल डिलीट करायची आहे. त्याची तारीख आणि वेळ बघा.
- यानंतर पुन्हा सेटिंग्समध्ये जा आणि Additional Setting वर क्लिक करा.
- तिथे असलेल्या Use Network Provided time या पर्यायाला बंद करा.
- मेसेज आला तो दिवस आणि वेळ बघून घ्या आणि त्याच्या 5 किंवा 10 मिनिटांपूर्वी वेळ सेट करा.
- आता तुम्ही पुहा चाटवर जा आणि तिथे तुम्हाला Delete for Everyone हा पर्याय दिसेल.
- अशा पद्धतीने जुने मेसेज आणि मीडिया फाईल्स डिलीट करता येईल.
हे लक्षात ठेवा
जुने मेसेज डिलीट केल्यानंतर 4 जी नेटवर्क पुन्हा चालू करावे लागेल. तसेच तारीख पुन्हा सेट करावी लागेल. परंतु यासाठी आपले व्हॉट्सअॅप अपडेटेड असले पाहिजे.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ
Web Title: Know Steps Delete Old Chats And Media Files Whatsapp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..