Eye Color: तुमच्या डोळ्यांच्या रंगामागचं कारण माहितीये ? जाणून घ्या त्यामागचं सायन्स

अनेकांचे डोळे काळे, निळे आणि हिरवे देखील असतात. डोळ्यांच्या रंगामागचं नेमकं कारण जाणून घ्या.
Know the scientific reason of  eye color
Know the scientific reason of eye coloresakal

डोळे हे शरीरातील महत्वाच्या अवयवांमध्ये एक आहे. अनेकांना भेटल्यावर त्यांच्याशी आपला आय कॉन्टॅक्ट येतो. त्यामुळे दुसऱ्यांदा ते भेटल्यावर त्यांच्या डोळ्यांच्या रंगावरून देखील त्यांना ओळखता येतं. काळे, घारे डोळे अनेकांचे असतात. मात्र काहींच्या डोळ्याचा रंग वेगळा असतो. अनेकांचे डोळे वेगळे असण्यामागचं सायन्स अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊया त्यामागचं सायन्टिफिक कारण. (Know the scientific reason of eye color)

अनेक लोकांचे डोळे तपकिरी, तर काहींचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. मात्र काहींचे डोळे फार वेगळे असतात. त्यांच्या डोळ्यांचा रंग हिरवा राखाडी आणि निळा देखील असतो. अशा डोळ्यांची लोकं समोर आली की काही काळासाठी आपल्याला फार वेगळं वाटतं. पण असं नेमकं का होतं त्यामागचं कारण जाणून घ्या.

तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांचा रंग हा बुबुळाच्या मेलॅनिनवरून ठरतो. तसेच सभोवतालच्या प्रकाशाचाही बुबुळांच्या रंगावर परिणाम होतो. आपल्या डोळ्यांचा रंग ९ श्रेणींमध्ये विभागलेला आहे. डोळ्यांच्या रंगाशी संबंधित अशा १६ जीन्स आहेत. यातील दोन प्रमुख जीन्स डोळ्याच्या रंगासाठी जबाबदार असतात. OCA2 आणि HERC2 हे दोन जीन्स आहेत. आणि दोघांचेही क्रोमोझोम्स १५ मध्ये असतात. HERC2 जीन्स हे OCA2 च्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवते आणि HERC2 काही प्रमाणात निळ्या डोळ्यांसाठी जबाबदार आहे. OCA2 काही प्रमाणात निळ्या आणि हिरव्या डोळ्यांशी संबंधित आहे.

Know the scientific reason of  eye color
Eyes Health: स्क्रीनकडे बघून डोळ्यातून पाणी येतंय? हे पाच आयुर्वेदिक उपाय येतील कामी

अनेकांचे डोळे तपकिरी असतात. कारण त्याचं समिकरण विकसित करणारी जीन्स आणि क्रोमोझोम्स बहुतेक लोकांमध्ये असतात. असे मानले जाते की, निळे असलेल्या लोकांची संख्या जगात सर्वात कमी आहे. यामध्ये असंही मानलं जातं की ६ हजार ते १० हजार वर्षांपूर्वी मानवी जीन्समध्ये बदल झाला होता. त्यामुळे लोकांच्या डोळ्यांचा रंग निळा होऊ लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com