लिंबू मिरची लावण्यामागे अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक कारण देखील आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

know the scientific reason behind hanging lemons and chili

लिंबू मिरची लावण्यामागे अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक कारण देखील आहे

भारतात रुढी, पंरपरा, प्रथा अनेक जपल्या जातात. अनेकदा या प्रथा किंवा परंपरेकडे अंद्धश्रद्धा म्हणून बघितले जाते पण कधी कधी काही काही प्रथांमागे अंद्धश्रद्धा नसून वैज्ञानिक कारणही असते. अनेकदा घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लटकवलेले असते. याला अंद्धश्रद्धेचा भाग म्हणत लोकांच्या वाईट नजरांपासून वाचण्यासाठी हा उपाय केला जातो अशी सर्वसामान्यांची समज आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का की लिंबू आणि मिरची घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लटकवण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. हो, हे खरंय. हे कारण नेमकं कोणतं? या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: चोऱ्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल हा कॅमेरा; किंमत फक्त....

लिंबू आणि मिरच्या दुकानाच्या किंवा घराच्याबाहेर लटकवले जातात कारण यामागे घरावर किंवा दुकानावर वाईट नजर पडू नये अशी सर्वसामान्यांची श्रद्धा असते.

मुळात वै्ज्ञानिक कारण बघितले तर लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा खूप तीव्र गंध बाहेर फेकतो यामुळे लिंबू-मिरची दारावर लावल्याने माश्या आणि डास घरात येत नाहीत.

हेही वाचा: लवकरच भारतात येणार हवेतून पाणी काढणारे यंत्र

याशिवाय वास्तुशास्त्राच्यामते लिंबू आणि मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म आहेत त्यामुळे जर लिंबू आणि मिरची लावली तर वातावरणातील हवा शुद्ध राहते. त्यामुळे वास्तूशास्त्रामध्ये घराबाहेर लिंबाची झाडे लावण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Know The Scientific Reason Behind Hanging Lemons And Chili

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top