रेंज रोव्हरच्या ‘इव्होक’ची विक्री सुरू; स्पोर्ट्स ‘एसव्हीआर’चीही घोषणा

जाणून घ्या, किंमत आणि फिचर्सविषयी सारं काही
रेंज रोव्हरच्या ‘इव्होक’ची विक्री सुरू; स्पोर्ट्स ‘एसव्हीआर’चीही घोषणा

मुंबई : भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जॅग्‍वार लॅण्ड रोव्‍हर इंडियाने नवनवीन मॉडेल भारतीय बाजारात दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (६ जुलै) जॅग्‍वार लॅण्ड रोव्‍हरने भारतामध्‍ये नवीन ‘इव्होक’ या मॉडेलच्या विक्रीला सुरुवात केली. तसेच गेल्याच आठवड्यात रेंज रोव्‍हर स्‍पोर्टस ‘एसव्‍हीआर’च्‍या सादरीकरणाचीही घोषणा केली आहे. (land-rover-introduces-new-range-rover-evoque-in-india-2)

नवीन इव्होक इंजेनिअम २.० लिटर पेट्रोलवर आर-डायनॅमिक एसई ट्रिममध्‍ये, तसेच २.० लिटर डिझेल पॉवरट्रेनवर एस ट्रिमममध्‍ये उपलब्‍ध आहे. २.० लिटर पेट्रोल इंजिन १८४ केडब्‍ल्‍यू शक्‍ती व ३६५ एनएम टॉर्क जनरेट करते. तर २.० लिटर डिझेल इंजिन १५० केडब्‍ल्‍यू शक्‍ती व ४३० एनएम टॉर्क निर्माण करते. नवीन रेंज रोव्‍हर इव्होकची एक्‍स-शोरूम ६४.१२ लाखांपासून पुढे ठेवण्यात आली आहे.

रेंज रोव्‍हर स्‍पोर्टस एसव्‍हीआर ही एसव्‍हीआर रेंजच्‍या अव्‍वल ५.० लिटर सुपरचार्ज व्‍ही-८ पेट्रोल इंजिनसह उपलब्‍ध आहे. हे इंजिन ४२३ केडब्‍ल्‍यू शक्‍ती व ७०० एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार ० ते १०० किलोमीटर प्रतितासाचा वेग ४.५ सेकंदांमध्‍ये घेते. एसव्‍हीआरची एक्‍स-शोरूम किंमत २ कोटी १९ लाख ७ हजारांपासून सुरू होते.

"रेंज रोव्‍हर इव्होकने आधुनिक व स्‍मार्ट डिझाईनसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंटीरिअरची नवीन रंगसंगती व आधुनिक लँड रोव्‍हर तंत्रज्ञानामुळे इव्होकची शैली अधिक सुधारण्‍यात आली आहे. तर रेंज रोव्‍हर एसव्‍हीआर ही बी-स्‍पोक ब्रिटीश डिझाईनद्वारे बनवण्यात आली आहे", असं जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले.

रेंज रोव्‍हर इव्होकची वैशिष्ट्ये-

- इव्होकमध्‍ये प्रतिष्ठित रेंज रोव्‍हर लक्‍झरीसह अत्‍याधुनिक डिझाईन व सुधारित इंटीरिअर, तसेच अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

- नेक्‍स्‍ट-जनरेशन फोर-सिलिंडर इंजेनिअम डिझेल इंजिनसोबत २.० लिटर इंजेनिअम पेट्रोल इंजिन, जे उच्च कार्यक्षमता, शक्‍ती आणि ऑन-रोड उत्कृष्ट परफॉर्मन्‍स देते.

- थ्री-डी सराऊंड कॅमेरा, केबिन एअर आयोनायझेशनसह पीएम २.५ फिल्‍टर आणि वायरलेस डिवाईस चार्जिंगसह फोन सिग्‍नल बूस्‍टर देण्‍यात आला आहे

- लँड रोव्‍हरची सर्वात प्रगत इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम ‘पीव्‍ही’ रेंज रोव्‍हर इव्होकमध्‍येही उपलब्‍ध करून देण्यात आली आहे.

- नवीन ड्युअल टोन इंटीरिअर रंगसंगती डीप गार्नेट/इबोनी पहिल्‍यांदाच रेंज रोव्‍हर इव्होकमध्‍ये देण्यात आला आहे.

रेंज रोव्‍हर स्‍पोर्ट एसव्‍हीआरची वैशिष्ट्ये-

- रेंज रोव्‍हर स्‍पोर्ट एसव्‍हीआर ही उत्‍पादित केलेली आतापर्यंतची सर्वात जलद, सर्वात शक्तिशाली व डायनॅमिक लँड रोव्‍हर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

- जग्‍वार लँड रोव्‍हरच्‍या स्‍पेशल व्हेईकल ऑपरेशन्‍सनी डिझाईन, रचना व विकसित केलेले लक्‍झरी परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही कोव्‍हेन्‍ट्री, युके येथे उत्‍पादित करण्‍यात आले आहे.

- या कारमध्‍ये रेंज रोव्‍हर स्‍पोर्टसच्‍या वजनाने हलक्‍या व प्रबळ ऑल-अॅल्‍युमिनिअमचा वापर करण्यात आला आहे. तसेच रिफाइन्‍मेण्‍ट, लक्‍झरी व ऑफ-रोड क्षमता कायम ठेवण्‍यात आली आहे.

-चेसिसमध्‍ये सुधारणा करून एसव्‍हीआर ही रेंज रोव्‍हरला साजेसा असा आरामदायी किंवा कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर आरामदायी ड्रायव्हिंगची अनुभूती देते.

संपादन : शर्वरी जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com