IQOO 9T भारतात लॉन्च; किंमत अन् फीचर्स येथे जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

latest launch iqoo 9t launched in india check processor  price and other details here

IQOO 9T भारतात लॉन्च; किंमत अन् फीचर्स येथे जाणून घ्या

अखेर iQOO 9T स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला Qualcomm च्या फ्लॅगशिप प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 सह येणारा भारतातील पहिला फोन बनला आहे. या व्यतिरिक्त, या फोनमध्ये V1+ चिप देखील दिली आहे, जी एक डिस्प्ले चिप इंस्ट्रुमेंटल आहे आणि तुमचा गेमिंग आणि फोटोग्राफीचा एक्सपिरीएंस आणखी चांगला बनवते.

iQOO 9T किंमत आणि ऑफर

iQOO 9T दोन स्टोरेज ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. त्याच्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. तर फोनच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनवर तुम्हाला ICICI बँकेकडून 4000 रुपयांची सूट मिळत आहे, त्यासोबतच तुम्ही फोनचा 8GB व्हेरिएंट 45,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर फोनचा 12GB व्हेरिएंट केवळ 50,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. मात्र ही ऑफर फक्त ICICI बँक कार्ड वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

या स्मार्टफोनची पहिली सेल 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता Amazon वर सुरू होईल. तुम्ही हा फोन iQOO स्टोअरवर देखील खरेदी करू शकता. iQOO 9T दोन रंग पर्यायांमध्ये येतो, ज्याला Legend आणि Alpha असे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा: OnePlus चे सर्वात स्वस्त इयरबड लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

iQOO 9T 120Hz रिफ्रेश रेट आणि 360 Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या स्क्रीनच्या तळाशी एक सुपरसोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिले आहे.

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असून यामध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. या डिव्हाइसमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh बॅटरी दिली आहे. iQOO 9T Android 12-आधारित OriginOS Ocean वर चालतो.

कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 12-मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सर दिला आहे. हा कॅमेरा सेटअप Samsung GN5 सेन्सर आणि OIS सह येतो. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

हेही वाचा: Jio Vs Vi : तुमच्यासाठी 399 रुपयांचा कोणता पोस्टपेड प्लॅन आहे बेस्ट?

Web Title: Latest Launch Iqoo 9t Launched In India Check Processor Price And Other Details Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
go to top