Loan from Google Pay: आता गुगल पेवर झटपट मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loan from Google Pay: आता गुगल पेवर झटपट मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

Loan from Google Pay: आता गुगल पेवर झटपट मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

Loan from Google Pay: कित्येकदा आपल्याला अचानक पैशांची गरज पडते आणि बँकेमधून जास्त व्याज दराने कर्ज(Loan) घ्यावे लागते. अशामध्ये एक नवा पर्याय आहे ज्यामुळे तुम्हाला त्वरित १ लाख रुपयांपर्यंतचे लोक मिळू शकते. तुम्हाला गुगल पे माहित असेल. आता तुम्हाला गुगल पे द्वारे १ लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकते.

काय आहे नवे फिचर?

गुगल पेने डिएमआय फायनान्स लिमिटेडसोबत(DMI Finance Limited) करार केला आहे भागीदारी अंतर्गत, दोन्ही कंपन्या संयुक्तपणे डिजिटल वैयक्तिक कर्ज देत आहेत.

हेही वाचा: CET परीक्षा अर्जप्रक्रिया आजपासून सुरू, मे-जूनमध्ये पेपर होणार

किती कर्ज मिळेल? परतफेड कशी करावी लागेल?

गुगल पेमार्फत तुम्हाला १ लाखापर्यंत पर्सनल लोन डिजिटल द्वारे मिळू शकते. ते कर्ज ३६ महिने किंवा ३ वर्षांपेक्षा जास्त हप्त्यांमध्ये फेडू शकता. सध्या डीएमआय फायनान्स लिमिडेटसोबत पार्टनरशीप अतंर्गत ही सुविधा देशातील १५००० पिन कोड्सवर उपलब्ध आहे.

Google Pay कडून कर्ज घेण्याच्या अटी आणि नियम काय आहेत?

या कर्जाचा लाभ घेण्यासाठी, Google Pay वर ग्राहक असणे आवश्यक आहे आणि त्याचा क्रेडिट हिस्ट्री चांगली असली पाहिजे आणि नवीन खाते नसावे, तरच त्याला/तिला हे कर्ज मिळू शकेल. प्रत्येक व्यक्तीला हे कर्ज मिळलेच असे नाही कारण क्रेडिट हिस्ट्री चांगली असली पाहिजे.

प्री- क्वालिफाइड एलिजिबिल यूजर्स हे कर्जे DMI Finance Limited कडून घेऊ शकतील आणि कर्ज Google Pay द्वारे प्रदान केले जाईल.

हेही वाचा: MMRCL Recruitment 2022: मुंबई मेट्रोमध्ये अनेक पदांवर भरती, नोकरीची सुवर्ण संधी

किती वेळात मिळतात पैसे?

जर तुम्ही प्री-अप्रूव्ड कस्टमर्स असाल, तर ग्राहकाच्या कर्ज अर्जावर रिअल टाइममध्ये प्रक्रिया केली जाईल आणि काही काळानंतर तुम्ही तुमच्या खात्यात अर्ज केला असेल तितके 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तुम्हाला मिळेल.

टॅग्स :Googleloans