
lucknow brahmos yogi adityanath
esakal
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये तयार झालेली 'ब्रह्मोस' (BrahMos) क्षेपणास्त्रे आता शत्रूंना नामोहरम करण्यासाठी सज्ज झाली आहेत. भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेल्या या क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी १८ ऑक्टोबर रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लष्करासाठी सुपूर्द (Launch) केली जाईल.
लखनौच्या भटगाव येथे स्थापन झालेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्माण युनिटमध्ये (Missile Manufacturing Unit) ही क्षेपणास्त्रे तयार केली जात आहेत.
या युनिटचे उद्घाटन याच वर्षी ११ मे रोजी संरक्षण मंत्र्यांनी केले होते. ८० एकर परिसरात ३०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या युनिटमध्ये दरवर्षी ८० ते १०० क्षेपणास्त्रे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात ही क्षमता वाढवून प्रतिवर्ष १५० क्षेपणास्त्रे तयार करण्याची योजना आहे. हे युनिट भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.