Aaple Sarkar Chatbot : तुमचं व्हाट्सअ‍ॅप बनणार सेतू कार्यालय; मिनिटांत मिळणार कोणतेही शासकीय प्रमाणपत्र अन् बस तिकिट,कशी वापराल ही सुविधा?

Aaple Sarkar Whatsapp Chatbot Service Devendra Fadnavis : महाराष्ट्र सरकार लवकरच व्हाट्सअ‍ॅपवर प्रमाणपत्र डाउनलोड, बस तिकीट बुकिंगसारख्या सेवा उपलब्ध करणार आहे. "आपले सरकार" चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी योजना माहिती मिळवणे आणि समस्यांचे निराकरण करणे सोपे होईल.
Aaple Sarkar Whatsapp Chatbot Service Devendra Fadnavis
Aaple Sarkar Whatsapp Chatbot Service Devendra Fadnavisesakal
Updated on

Aaple Sarkar Whatsapp Chatbot Service : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी डिजिटल सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रमाणपत्रे डाउनलोड करणे, सरकारी योजनांची माहिती मिळवणे आणि बस तिकिटे बुक करणे आता सहज शक्य होईल. महाराष्ट्र सरकारने Meta सोबत भागीदारी करत "आपले सरकार" नावाचा नवीन AI Chatbot लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

WhatsApp वर सरकारच्या योजना काय आहे?

राज्यातील नागरिकांना सरकारी योजनांचा सहज लाभ मिळावा, तसेच वेळ आणि कागदपत्रांची बचत व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. व्हाट्सअ‍ॅप हा सर्वात जास्त वापरला जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे आणि आता यावरच थेट सरकारी सेवा देखील मिळू शकणार आहेत.

या नव्या WhatsApp सेवेअंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा-

  • महत्त्वाची प्रमाणपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा (उदा. जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र)

  • शासकीय योजनांची माहिती मिळवण्याची सोय

  • ST महामंडळाच्या बस तिकिटांचे बुकिंग

  • तक्रारी नोंदवणे आणि त्यावर त्वरित कारवाई

Aaple Sarkar Whatsapp Chatbot Service Devendra Fadnavis
Bike Launch March 2025 : बाईक प्रेमींसाठी मार्च महिना एकदम खास! लाँच होणार 'या' 5 बाईक अन् स्कूटर; किंमत, फीचर्स पाहा एका क्लिकवर

WhatsApp वर "आपले सरकार" चा वापर कसा कराल?

  • "आपले सरकार" हा AI-आधारित Chatbot मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध असेल.

  • नागरिक टेक्स्ट किंवा व्हॉइस कमांडच्या माध्यमातून सहज संवाद साधू शकतील.

  • एका क्लिकमध्ये हवी ती माहिती मिळवता येईल आणि गरजेची कागदपत्रे डाउनलोड करता येतील.

  • बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ST महामंडळाच्या तिकिट बुकिंगची सुविधा असणार आहे.

Aaple Sarkar Whatsapp Chatbot Service Devendra Fadnavis
Sunita Williams Update : सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल मोठी अपडेट! पृथ्वीवर कधी, कुठे अन् कशा येणार? सर्व डिटेल्स एका क्लिकवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "ही नवी सेवा म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा आहे. जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी जनरेटिव्ह AI (GenAI) चा वापर करण्यात आला आहे. Meta च्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने "Llama" नावाच्या AI तंत्रज्ञानावर आधारित मोठ्या प्रमाणावर सेवा सक्षम केल्या आहेत."

ही नवी WhatsApp सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज भासणार नाही. सरकारी सेवा आता एका क्लिकवर मिळणार असून, यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. तुम्हीही WhatsApp वापरत असाल, तर लवकरच तुमच्या मोबाईलवर या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com