महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जवर धावेल 140 किमी | Mahindra eKUV100 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahindra eKUV100

महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जवर धावेल 140 किमी

सध्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी चढाओढ लागली आहे. टाटा मोटार्सने Tata Nexon EV, Tata Tigor EV, Tata Altroz ​​EV आणि Tata Punch EV या कार लाँचची घोषणा केल्यानंतर, महिंद्रा एंड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने देखील पुढच्या वर्षी भारतात अनेक इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करणार आहे, ज्यात पहिल्या क्रमांक महिंद्रा KUV इलेक्ट्रिक (Mahindra eKUV100) आहे.

हेही वाचा: पुढच्या आठवड्यात येतेय Hyundai Creta; काय असतील नवीन फीचर्स?

लवकरच लॉन्च होणार आहे

Mahindra KUV100 इलेक्ट्रिक हे ऑटो एक्सपो 2020 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आली होती आणि तेव्हापासून मीडिया रिपोर्ट येत आहेत की ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV असेल. नुकतेच याचे प्रोडक्शन रेडी व्हर्जन टेस्टिंग दरम्यान समोर आवे, त्यानंतर या गाडीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे लवकरच ही कार भारतीय बाजारपेठेत सादर केली जाईल. ही मायक्रो एसयूव्ही त्याच्या फॉसिल फ्यूल व्हेरियंटप्रमाणेच लुक आणि फीचर्ससह सुसज्ज असेल. महिंद्रा पुढील वर्षी भारतात KUV इलेक्ट्रिक सोबत Mahindra XUV300 इलेक्ट्रिक लॉन्च करणार आहे.

हेही वाचा: गुगलचा नवा नियम आजपासून लागू; सर्वच वापरकर्त्यांसाठी असेल अनिवार्य

सिंगल चार्जवर 140 किमी धावेल

महिंद्राची ही इलेक्ट्रिक कार 40kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाईल आणि यामध्ये 15.9 kWh बॅटरी पॅक असेल, जी 40 bhp पॉवर आणि 120 Nm टॉर्क जनरेट करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा KUV100 इलेक्ट्रिक एका चार्जमध्ये 140 किमी पर्यंत सहज चालवता येते. चार्जिंगबद्दल बोलायचे झाले तर, घरच्या घरी एसी चार्जरच्या मदतीने ही कार सुमारे 6 तासात पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकते. त्याच वेळी, DC फास्ट चार्जिंगद्वारे, ते एका तासापेक्षा कमी वेळेत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केले जाऊ शकते. आगामी काळात टाटाच्या लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील येणार आहे आणि त्यानंतर KUV100 इलेक्ट्रिकची पंच इलेक्ट्रिकशी थेट स्पर्धा होईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobile
loading image
go to top