प्रतिक्षा संपली! पहिली इलेक्ट्रिक रिक्षा Mahindra Treo करा खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahindra Treo
प्रतिक्षा संपली! पहिली इलेक्ट्रिक रिक्षा Mahindra Treo करा खरेदी

प्रतिक्षा संपली! पहिली इलेक्ट्रिक रिक्षा Mahindra Treo करा खरेदी

औरंगाबाद : भारताची पहिली इलेक्ट्रिक रिक्षा महिंद्रा ट्रेयो गेल्या महिन्यात लाँच करण्यात आली आहे. ही महिंद्रा ट्रेयो (Mahindra Treo)आता महाराष्ट्रातही (Maharashtra) खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे. याबाबत महिंद्रा इलेक्ट्रिकने (Mahindra Electric) ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, की महिंद्रा ट्रेयो आता महाराष्ट्रात. एक्स शोरुममधील तिची किंमत आहे २.९ लाख. यावर फेम आणि राज्याकडून अनुदानही मिळेल असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. महिंद्रा ट्रेयोची संकल्पना प्रथम ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये सादर करण्यात आली. या रिक्षाच्या माध्यमातून बचतही करता येईल असा दावा करण्यात आला आहे. ट्रेयो ही माॅड्यूलर प्लॅटफाॅर्मवर आधारित आहे.

हेही वाचा: Suzuki Burgman Street स्कूटर खरेदी करा १० हजारात

महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश बाबू म्हणतात, खरेदी करणाऱ्या मालकाची यातून २० टक्क्यांपेक्षा अधिक बचत होईल. हा भारतातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही २०१० पासूनच इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासाला आणि गुंतवणुकीला प्रारंभ केला होता, असे महिंद्रा अँड महिंद्रा आणि महिंद्र इलेक्ट्रिकचे अध्यक्ष डाॅ. पवन गोएंका म्हणाले. महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेयोची जोरदार मार्केटिंग सुरु केली आहे. कंपनीने ट्विटवर काही महिंद्रा ट्रेयो विकत घेतलेल्या चालकांचे अनुभव शेअर केले आहेत.

Web Title: Mahindra Electrics First Electric Auto Mahindra Treo Now In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Electric vehicle
go to top