Mahindra SUV : Mahindra च्या या SUV ला तोडच नाही, या मॉडेल्सची एका महिन्यात झाली प्रचंड विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahindra SUV

Mahindra SUV : Mahindra च्या या SUV ला तोडच नाही, या मॉडेल्सची एका महिन्यात झाली प्रचंड विक्री

Mahindra SUV : महिंद्राच्या SUV कार्स भारतात ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत, इतक्या की त्यांची एक क्रेझच निर्माण झालीय. जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा प्लॅन बनवला असेल, तर महिंद्राची मॉडेल्स सर्वोत्तम पर्याय असू शकतात. या कंपनीच्या महिंद्रा स्कॉर्पिओ, XUV700 सारख्या SUV गाड्या लोकप्रिय आहेत. आता मग या गाड्यांची विक्री किती होते? असा प्रश्न तुम्हाला सहज पडला असेल. तर बघुया कोणत्या suv चा खप किती आहे.

महिंद्रा बोलेरो : महिंद्रा बोलेरो ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. गेल्या महिन्यात 9,782 गाड्यांची विक्री झाली. या गाडीची खेडेगावात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विक्री होते. महिंद्रा लवकरच महिंद्रा बोलेरो निओ प्लस 7 आणि 9 सीट ऑप्शन बाजारात आणणार आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ : फेब्रुवारी 2023 मध्ये, महिंद्र स्कॉर्पिओच्या 6,950 युनिट्स विकल्या गेल्या. यामध्ये स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक या दोन्हींचा समावेश आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या स्कॉर्पिओ एनने बुकिंगचे सर्व रेकॉर्ड मोडले. त्याच बरोबर स्कॉर्पिओ क्लासिक देखील नवीन शैलीत सादर करण्यात आली आहे.

महिंद्रा थार : ऑफ-रोड फीचर्समुळे लोकांना वेड लावणारी थार ही महिंद्राची तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV आहे. वाढती मागणी लक्षात घेता, कंपनीने थारचं स्वस्त मॉडेल लॉन्च केलाय. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. गेल्या महिन्यात एकूण 5,004 युनिट्सची विक्री झाली आहे.

Mahindra XUV700 : Mahindra XUV700 ही कंपनीची चौथी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या मॉडेलने रेकॉर्डब्रेक बुकिंगही केले. प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधी असलेल्या कारमध्ये देखील हे स्थान आहे. गेल्या महिन्यात एकूण 4,505 युनिट्सची विक्री झाली आहे.