esakal | महिंद्रा Xuv700 ची बुकिंग 'या' तारखेला होणार सुरू, वाचा किंमतीसह सर्वकाही
sakal

बोलून बातमी शोधा

Mahindra XUV 700

महिंद्रा Xuv700 ची बुकिंग 'या' तारखेला होणार सुरू, पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड त्यांच्या प्रीमियम स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (SUV) XUV700 साठी 7 ऑक्टोबर पासून बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. कंपनी XUV700 डिझेल आणि पेट्रोल, मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक ऑप्शनसह 5 आणि 7-सीटर कार व्हेरियंट विक्रीसाठी उपलब्ध होईल, जे ऑप्शनल ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) स्पेकमध्ये देखील उपलब्ध असेल. महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार, XUV700 चे बुकिंग 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तसेच ऑटोमेकरने डिलिव्हरी सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

सुरुवातीच्या 25,000 ग्राहकांना मिळणार ऑफर

कंपनीने Mahindra XUV 700 एसयूव्ही सिरीज MX आणि AdrenoX (AX) या दोन मॉडल्समध्ये सादर करण्यात येईल, या कारची AdrenoX सीरीज AX3, AX5 आणि AX7 अशा तीन व्हेरियंट मध्ये सादर करण्यात आली आहे. किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास MX सीरीजसाठी (MT, पेट्रोल, 5-सीटर) 11.99 लाख रुपये आणि AX सीरीजसाठी (MT, पेट्रोल, 5-सीटर) 13.99 लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून या सर्व किंमती फक्त पहिल्या 25,000 बुकिंगसाठी लागू होतील.

महिंद्रा ने XUV700 साठी आपल्या वेबसाइटवर 'अॅड टू कार्ट' फंक्शन लॉन्च केले आहे. ही फीचर ग्राहकांना बुकिंग सुरू होण्यापूर्वी इंधन प्रकार, आसन क्षमता, रंग आणि डीलरसह विशिष्ट माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, AX7 ऑप्शनल लक्झरी पॅकसह उपलब्ध होईल आणि त्यात इमर्सिव्ह 3 डी साउंड, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेड स्मार्ट डोअर हँडल्स, 360 साराऊंड व्ह्यू, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्क ब्रेक आणि वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स असतील.

लक्झरी पॅकेज किंमत

AX7 वर उपलब्ध असलेल्या लक्झरी पॅकची अतिरिक्त किंमत 1.8 लाख रुपये असेल, तर AX7 डिझेल ऑटोमॅटीक AWD वर 1.3 लाख रुपये जास्त द्यावे लागतील. XUV700 कारला चार व्हेरियंट MX, AX3, AX5 आणि AX7 मध्ये लॉंच करण्यात येईल. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय, पाच आणि सात सीट्स आणि मॅन्युअल तसेच AMT ट्रान्समिशन ऑप्शन्समध्ये येईल.

loading image
go to top