जीमेल इनबॉक्‍स बनवा स्मार्ट

जयदीप नार्वेकर
सोमवार, 26 जून 2017

तुम्हाला जीमेल इनबॉक्‍सला अधिक आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीने पाहायचे असेल, तर काही फीचर आणि एक्‍स्टेंशनच्या मदतीने बदल करू शकता. त्यामुळे तुमचा इनबॉक्स स्मार्ट होतो आणि आकर्षक दिसतो.

जी मेलमधील फिचरच्या मदतीने इनबॉक्‍सचा चेहरामोहरा बदलला तर आपले काम आणखीच सोपे होईल. त्याचबरोबर दुसऱ्यांसाठीही पाठविण्यात येणाऱ्या मेलला स्पेशल करू शकतो.

सेंडरची कंपनी आणि लोगो पाहा 
मेल पाठविणाऱ्याची कंपनी आणि लोगो पाहायचा असेल तर यासाठी आपल्याला क्रोम एक्‍स्टेंशनची गरज भासणार आहे. सर्वांत अगोदर गुगल क्रोममध्ये पुढील लिंक सुरू करा. https://goo.gl/iUAbp7 हे एक क्रोम एक्‍स्टेंशन आहे. आता ॲड टू क्रोमवर क्‍लिक करा आणि हा ॲप काही मिनिटातच इन्स्टॉल होईल. काही वेळातच हा ॲप आपल्याला गुगल मेल वापरण्यासंदर्भातील परवानगी मागेल. त्यानंतर जेव्हा आपण जीमेलचा इनबॉक्‍स सुरू करू, तेव्हा प्रत्येक मेलवर त्या कंपनीचा लोगो आणि नाव समोर येईल. 

इनबॉक्‍सची थीम बदला
यासाठी आपल्याला जीमेलच्या डाव्या बाजूला दिलेल्या गीअर बॉक्‍सवर क्‍लिक करावे लागेल. या ठिकाणी आपल्याला थिम्सचा ऑप्शन पाहायला मिळेल. यात दाखविलेल्या अनेक प्रकारच्या थिम्समधून आपण एका थिम्सची निवड करू शकतो आणि त्यात आपल्या इनबॉक्‍सवर अप्लाय करू शकतो. 

मराठीत लिहिण्याचा पर्याय
जर आपल्याला इन्स्टॉलविना मराठी किंवा अन्य प्रादेशिक भाषेत ईमेल लिहायचा असेल तर जीमेलमध्ये याची सुविधा दिलेली आहे. यासाठी आपण डाव्या बाजूला असलेल्या गीअरबॉक्‍सजवळ दिलेल्या की-पॅडवर क्‍लिक करा. या ठिकाणी डिफॉल्ट भाषेत इंग्रजी पाहावयास मिळेल. जर आपण याला मराठी किंवा अन्य भाषा जोडायची असेल तर इनपुट-टूल्स आणि सेंटिगच्या पर्यायावर क्‍लिक करा. या ठिकाणी मराठी किंवा इतर मातृभाषेचा पर्याय निवडून सेंटिंगला सेव्ह करा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make Gmail Inbox Smart