सावधान! बँक खातं रिकामं करणारी 23 ॲप्स करा डिलीट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

मोबाईल अ‍ॅप्सद्वारे युजर्सची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा युजर्सना सावध राहण्याचा इशारा देत काही मोबाईल अ‍ॅप्स डिलिट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - सध्याच्या डिजिटल जगात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या फोनमधील ॲपमधून हॅकर्स जाळे पसरतात. यातून बँक डिटेल्स आणि इतर माहिती चोरली जाते आणि फसवणूक होते. अनेकदा आपण पैसे काढले नसतानाही अकाउंटवरून काही रक्कम अचानक कमी झाल्याचं आढळतं. मोबाईल अ‍ॅप्सद्वारे युजर्सची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा युजर्सना सावध राहण्याचा इशारा देत काही मोबाईल अ‍ॅप्स डिलिट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही ॲप अशी आहेत ज्यावरून युजर्सच्या बॅंक खात्याबद्दल माहीती घेतली जाते. त्यानंतर त्यांच्या खात्यातील पैसे परस्पर काढले जातात. सायबर सुरक्षा आणि सॉफ्टवेअर कंपनी  सोफोसच्या (Sophos) संशोधकांनी या धोकादायक ॲपबद्दल माहिती दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिपोर्टनुसार हे सर्व फ्लेसवेयर (fleeceware) ॲप मालवेअरचाच एक प्रकार जो लपविला गेलेला छुप्या शुल्कासह घेता येतो. बऱ्याच युजर्सना हे ॲप काढल्यानंतर त्याचे सब्सक्रिप्शन कसे रद्द करायचे ते समजत नाही.) ॲप असून त्यांनी गुगल प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघनही केले आहे. संशोधक जगदीश चंद्राहीया यांनी त्यांच्या ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले की, गूगलचे नवीन नियम भ्रामक मार्केटिंग डिस्प्लेची जाहिरात शोधण्यासाठी तयार केले गेले आहेत, परंतु त्यात काही त्रुटी असल्याने बऱ्याचदा काही गोष्टींना परवानगी मिळते. 

धोकादायक ॲप

 • com.photoconverter.fileconverter.jpegconverter
 • com.recoverydeleted.recoveryphoto.photobackup
 • com.screenrecorder.gamerecorder.screenrecording
 • com.photogridmixer.instagrid
 • com.compressvideo.videoextractor
 • com.smartsearch.imagessearch
 • com.emmcs.wallpapper
 • com.wallpaper.work.application
 • com.gametris.wallpaper.application
 • com.tell.shortvideocom.csxykk.fontmoji
 • com.video.magiciancom.el2020xstar.xstar
 • com.dev.palmistryastrology
 • com.dev.furturescopecom.fortunemirror
 • com.itools.prankcallfreelitecom.isocial.fakechat
 • com.old.mecom.myreplica.celebritylikeme.pro
 • com.nineteen.pokeradar
 • com.pokemongo.ivgocalculatorcom.hy.gscanner

हे ॲप कसे कार्य करतात -
वापरकर्त्यांना फसवण्याचे अनेक फंडे हे ॲप वापरत असतात. या स्पॅम सबस्क्रिप्शनशिवाय, ते विनामूल्य म्हणत वापरकर्त्यांना आमिष दाखवतात. सबस्क्रिप्शन कधी संपेल आणि त्यानंतर किती शुल्क आकारले जाईल हे सांगितले जात नाही. तसंच टर्म आणि कंडीशन आपण अनेकदा वाचत नाही आणि ते अशक्य नसतं. त्यानंतर तुम्ही एकदा या तुम्ही ॲपमध्ये साइनअप केले की आपली परवानगी घेतल्याशिवाय इतर ॲप इंस्टॉल केले जातात. बर्‍याचदा वापरकर्त्यांना माहित नसतानाही शेकडो ॲप इंस्टॉल होतात.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malware found in 23 apps delete and keep safe your mobile