
Solar Car : इनोव्हेशनला सलाम! टाटा नॅनोपासून बनवली 'सोलार कार'; फक्त ३५ रुपयांत चालते १०० किमी
जग विज्ञान आणि तंत्रज्ञानात कितीही पुढे गेले तरी भारतीय जुगाडाला मात्र तोड नाही. कुठल्याही अवघड समस्येच दोन मिनीटात भारतीय जुगाड शोधल्याचे शेकडो उदाहरणे पाहायला मिळतात. यातच सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवर देखील असंच देसी जुगाड पश्चिम बंगालमधील एकाने शोधलं आहे. या व्यक्तीने टाटा नॅनो कारपासून 'पेट्रोल लेस कार' बनवली आहे.
विना इंजीन धावते कार..
न्युज १८ च्या रिपोर्टनुसार, पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्यातील मनोजित मंडल यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. व्यावसायाने मंडल हे व्यापारी आहेत. त्यांनी त्यांची पेट्रोलवर चालणारी कार सोलर कार बनवली आहे. इतकेच नाही तर मंडल यांची ही अनोखी कार विना इंजीन रस्त्यावर धावते.
मनोजित मंडल यांची कार पेट्रोल फ्री सोलर कार आहे. ही कार ३० ते ३५ रुपयांत १०० किलोमिटर पर्यंत आरामात चालू शकते. जेव्हा ही कार रस्त्यावर दिसते तेव्हा लोक नुसते पाहातच राहातात.
पेट्रोलच्या वाढत्या किंमतीचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. पेट्रोलच्या किमती खिशाला परवडणाऱ्या राहिलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मंडल यांनी विना इंजिन, पेट्रोल, आवाज धावणारी गाडी विकसीत केली आहे. या अनोख्या गाडीमध्ये गिअर सिस्टीम देखील मिळते. महत्वाचे म्हणजे कसलाही आवाज न करता ही गाडी ८० किलोमिटर प्रतितास वेगाने धावते.