खास पुरुषांसाठी! 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल'ची चाचणी सुरू होतेय..! 

वृत्तसंस्था
शनिवार, 23 डिसेंबर 2017

न्यूयॉर्क : स्पर्म काऊंट लक्षणीयरित्या कमी करणारे पुरुषांसाठीच्या पहिल्या 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल'ची आता वैद्यकीय चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली, तर लवकरच हे 'जेल' बाजारात उपलब्ध होऊ शकते. एखाद्या बामप्रमाणे वापरायचे असलेले हे 'जेल' तयार करण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञ गेले दशकभर प्रयत्न करत होते. 

न्यूयॉर्क : स्पर्म काऊंट लक्षणीयरित्या कमी करणारे पुरुषांसाठीच्या पहिल्या 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल'ची आता वैद्यकीय चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली, तर लवकरच हे 'जेल' बाजारात उपलब्ध होऊ शकते. एखाद्या बामप्रमाणे वापरायचे असलेले हे 'जेल' तयार करण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञ गेले दशकभर प्रयत्न करत होते. 

आता येत्या एप्रिलमध्ये 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल'ची चाचणी होणार आहे. सहा महिन्यांच्या प्राथमिक चाचणीतून हे 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल' उपयुक्त असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल' प्रभावी ठरण्यासाठी खांदे आणि हाताला ते रोज लावावे लागेल. यामुळे पुरुषातील स्पर्म काऊंट 89 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकतो. यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. 

प्राथमिक झालेल्यांपैकी 78 टक्के पुरुषांमध्ये स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याचे आढळून आले. या चाचणीमध्ये दोन प्रकारचे 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल' वापरण्यात आले. आता या दोन्हींचे मिळून एकच 'जेल' तयार करण्याचे काम सुरू आहे. एप्रिल 2018 मध्ये सुरू होणारी ही वैद्यकीय चाचणी पुढील चार वर्षे चालणार आहे. यात 400 हून अधिक दाम्पत्य सहभागी होणार आहेत. 

या चाचणीत सहभागी झालेल्या पुरुषांना 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल' दिले जाणार आहे. रोज हे 'जेल' खांदा आणि हाताला लावायचे आहे. हे किमान चार महिने रोज करणे अपेक्षित आहे. याच दरम्यान त्या दाम्पत्यांमधील महिलाही त्यांच्यासाठीचे गर्भनिरोधक उपाय वापरतील. पुरुषांमधील स्पर्म काऊंट प्रति मिलिलिटर दहा लाखांपेक्षा कमी होईपर्यंत शास्त्रज्ञ त्यावर नजर ठेवून असणार आहेत. हे लक्ष्य साध्य झाल्यानंतर महिलांचे गर्भनिरोधक उपाय बंद करण्यात येतील. त्यानंतर ही दाम्पत्ये गर्भनिरोधक म्हणून केवळ पुरुषांचे 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल' वापरतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news contraceptive GEL for men to reduce sperm count