'फेस रिकग्निशन' फिचरसह 'ऑनर व्ही 10' लाँच

गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

'ऑनर'ने अनेक वैशिष्ट्यांसह 'ऑनर व्ही10' बाजारात आणला आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 'फेस रिकग्निशन' या तंत्रज्ञानाने अनलॉक करता येईल. त्याशिवाय सगळे लेटेस्ट फिचर्स या फोनमध्ये असतील. 

हुवेई या कंपनीचा भाग असलेल्या 'ऑनर' या कंपनीने मंगळवारी 'ऑनर व्ही10' हा फ्लॅगशीप स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला व 5 डिसेंबरला हा फोन जगभर लाँच होईल. ऑनरने अनेक वैशिष्ट्यांसह 'ऑनर व्ही10' बाजारात आणला आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 'फेस रेक्गनिशन' या तंत्रज्ञानाने अनलॉक करता येईल. त्याशिवाय सगळे लेटेस्ट फिचर्स या फोनमध्ये असतील. 

या फोनची स्क्रिन 5.99 इंच इतकी असून फुल एचडी प्लस 18 : 9 अॅस्पेक्ट रेशो इतका डिस्प्ले आहे, तर स्क्रिन रिजोल्युशन 2160*1080 पिक्सल्स क्षमतेचे आहे. 'ऑनर व्ही10' हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम - 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम - 128 जीबी स्टोरेज अशा दोन पर्यायांमध्ये ग्राहकांसाठी खुला करण्यात येईल. यात हिसीलीकॉन किरीन 970 ऑक्टा कोअर प्रोसेसर व जी 72 एमपी 12 इतका ग्राफिक प्रोसेसर आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 8.0 ओरिओवर आधारित इएमयुआय 8.0 ही ऑपरेटींग सिस्टीम वापरण्यात आली आहे. फोनला 3750 मिलीअॅम्पिअर क्षमतेची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

'ऑनर व्ही10' चा कॅमेरा हा 'सेल्फि लव्हर्स'साठी पर्वणीच आहे. या फोनला मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह 16 व 20 मेगापिक्सल्स क्षमतेचा ड्युअल कॅमेरा आहे, तर 13 मेगापिक्सल्स क्षमतेचा उत्तम रिजोल्युशन असलेला फ्रंट कॅमेरा आहे. तसेच यातून फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरणही करता येईल. तसेच हा फोन 'फेस रेक्गनिशन' व त्याचबरोबर 'फिंगरप्रिंट सेन्सर'ने अनलॉक करता येईल. 'ऑनर व्ही10' आपल्यासाठी बीच गोल्ड, अरोरा ब्लु, चार्म रेड व ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध होईल. या फोनची किंमत 26,000 ते 35,000 इतकी असून तो लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news launching of 'honor v10' in china