हॅकर्स तुमची माहिती कशी चोरतात?

मनिष गिताराम कुलकर्णी
बुधवार, 27 डिसेंबर 2017

आपण सध्या एका संगणकाचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या जगात राहत आहोत. एका सर्वेक्षणा नुसार भारतातील जगभरात  स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 2.3 अब्ज इतकी आहे ही आकडेवारी  2017 पर्यंत  299.24 दशलक्षांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.या सगळ्यांचा संबद्ध इंटरनेटशी आहे म्हणजेच इंटरनेट हा जीवनामधील अविभाज्य घटक झालेला आहे.ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे तसे तोटे ही स्वीकारावे लागतात तसेच इंटरनेटचे फायदे व तोटे आहेत.इंटरनेट मुळे तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला नकळत संकलीत करून तिचा दुरुपयोग होऊ शकतो.

आपण सध्या एका संगणकाचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या जगात राहत आहोत. एका सर्वेक्षणा नुसार भारतातील जगभरात  स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 2.3 अब्ज इतकी आहे ही आकडेवारी  2017 पर्यंत  299.24 दशलक्षांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.या सगळ्यांचा संबद्ध इंटरनेटशी आहे म्हणजेच इंटरनेट हा जीवनामधील अविभाज्य घटक झालेला आहे.ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे तसे तोटे ही स्वीकारावे लागतात तसेच इंटरनेटचे फायदे व तोटे आहेत.इंटरनेट मुळे तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला नकळत संकलीत करून तिचा दुरुपयोग होऊ शकतो.

स्मार्टफोन /संगणक हॅक झाल्यास काय होऊ शकते?
हॅकिंग झाल्यास अनेक गोष्टी होऊ शकतात.आपल्या उपकरणाचा गुप्तपणे ताबा मिळवुन ते आपल्या संगणकावर केलेल्या कोणत्याही गोष्टीचे परीक्षण करू शकतात,आपल्या संगणकावर कोणत्याही स्वरूपातील माहिती प्राप्त करू शकतात (फायली डाउनलोड / ऍक्सेस). आपल्या नेहमीच्या वापरातील पुढील गोष्टींचा दुरोपयोग करू शकतात.

 1. बँक खाते, ऑनलाइन गेम खाती इत्यादि वापरू शकतात. 
 2. सोशल मीडिया खाती.
 3. आपल्या संगणकावरील फायली.
 4. फोटो आणि व्हिडिओ.
 5. कॅमेरा आणि मायक्रोफोन उघडणे.
 6. आपले पासवर्ड चोरी करणे.
 7. आपल्या सोशल मिडिया खात्याचा वापर दुर्भावनायुक्त हेतूने करणे.

हॅकर्स आपली माहिती कशी प्राप्त करतात ?
हॅकर्स आपली वैयक्तिक माहिती अनेक मार्गाने मिळऊन तीचा दुरुपयोग करू शकतात.

ओपन नेटवर्क : सर्वसाधारण पणे,सार्वजनिक वाय-फाय हे विनामूल्य इंटरनेट वापरण्यासाठी मोहक वाटते परंतु ओपन नेटवर्कला कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसते . जेव्हा आपण सार्वजनिक किंवा ओपन  वाय-फाय वर असाल तेव्हा हॅकर्स सहजपणे आपली प्रत्येक गोष्ट पाहू शकतात.

फिशिंग : फिशिंग म्हणजे आपल्या संगणकावर दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर स्थापित करून आपल्या कॉम्प्यूटरच्या वैयक्तिक माहितीची चोरी करणे होय.फिशिंग स्कॅम हे हॅकर्ससाठी आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्याचा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे आणि जर ते यशस्वी झाले तर हॅकर वापरकर्त्याची नावे, पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड तपशील मिळवू शकतात.

पासवर्ड : बहुतेक लोकांना एकच समान पासवर्ड विविध खात्यांना वापरण्याची सवय असते. आपल्या खात्यांच्यी नावं सहज उपलब्ध होऊ शकतात. जर समान पासवर्ड असेल तर अशी खाते सहजरीत्या हॅक होऊ शकतात.

ऑनलाईन व्यवहार : ऑनलाईन वेबसाइटवर व्यवहार करताना सदर वेबसाइट्स आपली क्रेडिट कार्डची माहिती संग्रहित करतात. तथापि, हे खूप धोकादायक आहे. एखाद्या विशिष्ट वेबसाइट हॅक झाल्यास, आपली वैयक्तिक क्रेडिट कार्डची माहिती हॅकर्स प्राप्त करू शकतात.

सोशल मीडिया : सोशल मीडिया मित्रांसोबत जोडलेले राहण्यासाठी एक मजेदार ठिकाण ठरू शकते, परंतु जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात अज्ञात किंवा गुप्त माहिती तिथे प्रकट करता तेव्हा हॅकर्सना आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत होते.

आपण हॅक झाल्याची चिन्हे
खंडणी : आपला  मौल्यवान डेटा  लॉक करून तो परत मिळविण्यासाठी ऑनलाइन चलन वापरून खंडणीची मागणी करणे.उदा.Ransomware
बनावट अँटीव्हायरस संदेश : बनावट अँटीव्हायरस आपल्याला चेतावणीचे संदेश देतात जसे आपल्या सिस्टम मध्ये व्हाईरस आहेत.
अनावश्यक ब्राउझर टूलबार : आपल्या ब्राउझरमध्ये अनेक नवीन अनावश्यक टूलबार येतात व  आपल्याला हे टूलबार उपयोगी असल्याचे भासवतात.
पुनर्निर्देशित इंटरनेट शोध : अनेक हॅकर्स आपल्या ब्राउझरला आपण जिथे जाऊ इच्छिता त्यापेक्षा दुसरीकडे पुनर्निर्देशित करतात. एखाद्या  वेबसाइटवर नेऊन त्यावरील जाहीरातींवर क्लिक मिळवुन हॅकरला पैसे मिळतात.
वारंवार पॉपअप : ब्राउझर किंवा संगणकावर अनावश्यक पॉपअप येतात आणि त्यावर क्लिक मिळवुन हॅकरला पैसे मिळतात.
अनपेक्षित सॉफ्टवेअर स्थापित : अनपेक्षित सॉफ्टवेअर चा शिरकाव होणे  हे एक आपल्या संगणक प्रणाली हॅक झाल्याचे चिन्ह आहे.
माउसची हालचाल : काम करत असताना माउस पॉइंटर अपोआप हालचाल करून एखाद्या विशिष्ट ठिकाणी क्लिक होणे.बऱ्याचदा माउस खराब असेल तरी असे होते पण त्यावेळी त्याची हालचाल विशिष्ट दिशेने नसते.

आपण सुरक्षित कसे राहू शकता?
खरे तर हॅकरला पूर्णपणे थांबवणे जरी शक्य नसले तरी आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर हॅकींग मुळे होणारे नुकसान टाळू शकतो.

 • ऑपरेटिंग सिस्टम तसेच सॉफ्टवेअर प्रमाणित असावे,पायरेटेड सॉफ्टवेअर वापरू नका.
 • आपल्या OS आणि इतर सॉफ्टवेअर नेहमी वारंवार अपडेट करा.
 • गरज नसलेली तसेच संशयास्पद सॉफ्टवेअर काढून टाका.
 • अँटीव्हायरस आणि अँटी-माल्वेअर सॉफ्टवेअर, अँटी-स्पायवेअर आणि फायरवॉल सह अद्ययावत सुरक्षा प्रोग्रामचा वापर करा जेणेकरून आपण आक्रमण होण्यापूर्वीच थांबवू शकता.
 • मोफत व असुरक्षित WiFi वापरू नका.
 • अनोळखी किंवा गरज नसलेल्या वेबसाईट वापरू नका तसेच अश्या वेबसाईटवर कुठलीही माहिती देऊ नका.
 • मोहक ,फसव्या जाहिरातीच्या लिंकवर जाऊ नका किंवा तिथे आपली माहिती पुरवू नका.
 • एकच पासवर्ड सर्व खात्यांना वापरू नका.पासवर्ड वारंवार बदलणे गरजेचे आहे.
 • शक्यतो पासवर्ड मोठा व क्लीष्ट असावा.
 • वैयक्तिक संगणक,मोबाईल चा वापर दुसरा किंवा अनोळखी व्यक्ती करत नाही याची खात्री करा.
 • आपल्या महत्वपूर्ण माहितीचा वारंवार बॅकअप ठेवा.

आपली महत्वपूर्ण माहिती हॅक होऊन तिचा दुरुपयोग झाल्यास आपल्याला मानसिक किंवा आर्थिक फटका बसु शकतो अशी मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. काही छोट्या-छोट्या गोष्टींचे अनुसरण केल्यास आपल्याला शक्य तितक्या लवकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

Web Title: marathi news Technology How hackers steal your confidential information