'फेक न्यूज रोखण्यात फेसबुकला यश'

Marathi news technology news in Marathi Facebook fake news fake profiles
Marathi news technology news in Marathi Facebook fake news fake profiles

जर्मनमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात फेक न्यूजवर नियंत्रण आणण्यासाठी फेसबुकने हजारो फेक प्रोफाईल काढून टाकली असल्याची माहिती फेसबूकच्या अधिकाऱयांनी दिली. 

बनावट प्रोफाईलच्या आधारे खोट्या बातम्या पसरविण्याचा उद्योग अमेरिकेतील निवडणुकीच्या काळात झाला होता. त्यावरून फेसबुकवर सातत्याने टीका होत होती. जर्मन निवडणुकीमध्ये हा प्रकार होऊ नये, असे प्रयत्न फेसबुकने केले होते. 

युरोप, मध्य-पूर्व आफ्रिकेचे फेसबुकचे सार्वजनिक धोरण विभागाचे उपाध्यक्ष रिचर्ड अॅलन यांच्या दाव्यानुसार, खोटी माहिती पसरवण्यावर नियंत्रण आणण्यात जर्मन निवडणुकीत फेसबुकला चांगले यश मिळाले.

'फेसबुकवरील खोटी प्रोफाईल्स आणि खोटी माहिती पूर्णपणे थांबवता आली, असे नाही. मात्र, त्या प्रकारच्या माहितीचा प्रसार रोखण्यात आम्हाला यश आले. फेसबुक वापरकर्त्यांच्या न्यूज फीडमध्ये खोटी माहिती दिसण्याचे प्रमाण कमी झाले,' असे अॅलन यांनी निवेदनात म्हटले आहे. 

जर्मनीत रविवारी झालेल्या निवडणुकीत चॅन्सलर अँजेला मार्केल यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक युनियनला विजय मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com