
पुणे : सध्या कामासाठी आपण सर्रास 'जीमेल' चा वापर करतो. जीमेल आपल्या आयुष्याचा महत्वाचा घटक बनला आहे. पण हा ईमेल वापरत असताना त्यामध्ये असणारे असंख्य फिचर मात्र आपल्याला माहित नसतात. आज आपण जीमेलच्या दररोजच्या वापरात कितीतरी उपयोगी पडू शकेल अशा कॉन्फिडेन्शिअल मोड (Confidential Mode) या फिचरबद्दल माहिती घेणार आहोत.
काय आहे हा 'कॉन्फिडेन्शिअल मोड' ?
कॉन्फिडेन्शिअल मोड एक असा पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही पाठवलेल्या ईमेलचा एक्सेस हा तुमच्या स्वतःकडे ठेऊ शकता. असा मेल पाठवायचा असेल तर ते या 'कॉन्फिडेंशियल मोड' च्या माध्यमातून शक्य होते. 'कॉन्फिडेंशियल मोड' मध्ये तुम्ही पाठवलेल्या मेलचा एक्सेस कायमस्वरुपी समोरच्या व्यक्ती जवळ राहात नाही. पाठवलेला ईमेल ठराविक वेळेपर्यंत पाहिला आणि वाचला जाऊ शकतो. या फिचर मध्ये तुम्ही तुमच्या ईमेलसाठी एक्सपायरीची वेळ ठरवू शकता. एवढेच नाही तर हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही पाठवलेला ईमेल हा फॉरवर्ड, कॉपी, प्रिंट किंवा डाऊनलोड देखील करता येत नाही.
'कॉन्फिडेन्शिअल मोड' कसा वापराल?
1. सर्वप्रथम तुमचा जीमेल ओपन करा.
२. ईमेल पाठवण्यासाठी कंपोज (Compose) वर क्लिक करा.
3. तुमचा ईमेल 'कॉन्फिडेन्शिअल' करण्यासाठी कंपोज बॉक्सच्या खाली More या पर्यायांमध्ये असलेल्या घडी-लॉकच्या चिन्हावर क्लिक करा.
4. त्यानंतर तुमच्या ईमेलसाठी एक्सपायरीची तारीख निवडा किंवा पासकोड ठेवा.
5. या पासकोडमध्ये तुमच्यासाठी दोन पर्याय दिले जातील - 1. नो एसएमएस (SMS) पासकोड, 2. SMS पासकोड
6. नो SMS पासकोड हा पर्याय निवडला तर ज्याला आपण ईमेल पाठवतोय तो पासकोडशिवाय ईमेल वाचू शकतो. जर SMS पासकोड हा पर्याय निवडला तर मात्र ईमेल वाचण्यासाठी पासवर्ड लागेल. जो टेक्स्ट मॅसेजच्या माध्यमातून त्या व्यक्तीला जाईल. त्यासाठी पासकोड सेट करतेवेळी आपण ज्या व्यक्तीला ईमेल पाठवतोय त्याचाच नंबर द्यावा लागेल.
7. शेवटी सेव (SAVE) क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही जीमेलचे 'कॉन्फिडेन्शिअल मोड' हे भन्नाट फिचर वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.