Mark Zuckerberg : 'व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस' यूजर्ससाठी खुशखबर! नवीन फीचर्सची घोषणा; व्यापारात होणार फायदा

WhatsApp Business : बिझनेस वाढीसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा अधिक प्रभावी वापर करता येणार आहे.
Mark Zuckerberg WhatsApp Business
Mark Zuckerberg WhatsApp BusinesseSakal

मेटा कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आज (20 सप्टेंबर) काही मोठ्या घोषणा केल्या. भारतातील 'व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस' वापरणाऱ्या यूजर्ससाठी काही नवीन फीचर लाँच केले असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे बिझनेस वाढीसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा अधिक प्रभावी वापर करता येणार आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

व्यापारासाठी मेसेजिंगचा वापर करण्यात भारत अग्रेसर आहे. आपल्या व्यापाराची वृद्धी करण्यासाठी देशातील कित्येक लोक व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसचा वापर करतात. या लोकांच्या मदतीसाठीच व्हॉट्सअ‍ॅप काही नवीन टूल्स देणार आहे; असं झुकरबर्ग म्हणाले. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी व्हर्चुअली सहभाग नोंदवला होता.

Mark Zuckerberg WhatsApp Business
Elon Musk : आता सर्वांनाच 'एक्स' वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे? इलॉन मस्कने दिले संकेत

व्हॉट्सअ‍ॅप फ्लोज

यातील पहिलं फीचर म्हणजे WhatsApp Flows. या माध्यमातून बिझनेसेसना आपल्या चॅट थ्रेडमध्ये अधिक कस्टमाईज्ड अनुभव देऊ शकणार आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, एखादी बँक आपल्या बिझनेस अकाउंटच्या थ्रेडमध्ये ग्राहकांना अपॉइनमेंट बुक करण्याची सुविधा देऊ शकणार आहे. अशा प्रकारे इतर बिझनेस देखील आपल्या ग्राहकांना ठराविक सुविधा चॅट थ्रेडमध्येच उपलब्ध करून देऊ शकतील.

पेमेंट मेथड

यासोबतच, व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक फीचर भारतात लाँच केलं आहे. या माध्यमातून ग्राहक एखाद्या कंपनीच्या बिझनेस चॅट थ्रेडमधूनच सेवांसाठी पेमेंट करू शकणार आहेत. यामुळे ग्राहकांना दुसऱ्या अ‍ॅपमध्ये जावं लागणार नाही, आणि त्यांना चांगला यूजर एक्सपिरियन्स मिळणार आहे. ही सुविधा यापूर्वी ब्राझील आणि सिंगापूरमध्ये उपलब्ध होती, आता भारतातही ती उपलब्ध करण्यात येणार असल्याचं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने पेयू आणि रेझरपे कंपन्यांसोबत टायअप केलं आहे.

Mark Zuckerberg WhatsApp Business
WhatsApp Ads : पैसे कमावण्यासाठी मेटाचा नवा फंडा, आता व्हॉट्सअ‍ॅपवरही दिसणार जाहिराती? काय म्हणाली कंपनी?

मेटा व्हेरिफाईड

व्हॉट्सअ‍ॅपवर असणारे कित्येक बिझनेस हे आपली क्रेडिबिलिटी ग्राहकांना कळावी यासाठी व्हेरिफिकेशन बॅजची मागणी करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस यूजर्सनाही मेटा व्हेरिफिकेशन मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल; असं झुकरबर्ग म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com