Mark Zuckerberg Katana : झुकरबर्गचं चाललंय काय? जपानी मास्टरकडून घेतले तलवार बनवण्याचे धडे; व्हिडिओ केला शेअर

Mark Zuckerberg Instagram : मार्क झुकरबर्गने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन ही तलवार बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच त्याने स्वतः बनवलेल्या तलवारीचा फोटोही पोस्ट केला आहे.
Mark Zuckerberg Katana
Mark Zuckerberg KatanaeSakal

Zuckerberg makes Japanese Katana : फेसबुक अन् इन्स्टाग्राम बनवणाऱ्या मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे कायम चर्चेत असतात. कामासोबतच सुट्टी एंजॉय करताना ते नवनवीन गोष्टींचा आनंद घेतात. या गोष्टी ते सोशल मीडियावर देखील शेअर करत असतात. नुकतंच मार्कने चक्क 'कटाना' ही जपानी तलवार बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.

मार्क झुकरबर्गने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन ही तलवार बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच त्याने स्वतः बनवलेल्या तलवारीचा फोटोही पोस्ट केला आहे. "आज दुपारी मास्टर अकिहिरा कोकाजी यांच्याकडून कटाना बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. तुमची कला आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद." असं मार्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Mark Zuckerberg makes Katana)

मार्क झुकरबर्ग होणार निंजा?

मार्कच्या या पोस्टवर नेटिझन्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मार्कने यापूर्वी जुजुत्सु मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग देखील घेतले आहे. "आधी हँड कॉम्बॅट आणि आता कटाना.. तू निंजा होण्याची ट्रेनिंग घेत आहेस का?" असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर "ही समुराई तलवार बनवायला किती वेळ लागला?" असंही एकाने विचारलं आहे. इतर अनेकांनी मार्कच्या या नव्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

Mark Zuckerberg Katana
Mark Zuckerberg on Layoff : 'एआय'मुळे नव्हे, तर अनेक कारणांमुळे जातायत जगभरातील नोकऱ्या; मार्क झुकरबर्गने केलं स्पष्ट

मार्कचं आयुष्य धोक्यात?

काही दिवसांपूर्वीच मेटाने आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं होतं, की मार्क झुकरबर्गच्या जीवाला धोका आहे. यासाठी मार्कची लाईफस्टाईलच कारणीभूत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. मार्शल आर्ट्स आणि एडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड असल्यामुळे झुकरबर्गसोबतच कंपनीतील इतर अधिकाऱ्यांबाबत देखील असा इशारा देण्यात आला होता. यानंतर आता मार्कचा चक्क तलवार बनवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com