

Maruti Suzuki Victoris, winner of ICOTY 2026 with 5-star safety rating. Explore features, price starting at ₹10.50 lakh, strong hybrid options, and why it's India's top mid-size SUV
esakal
ICOTY 2026 : भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीची नवीन SUV विक्टोरिसने खळबळ माजवली आहे. लाँच झाल्यापासूनच ग्राहकांच्या मनात घर करणाऱ्या या शक्तिशाली आणि आकर्षक एसयूव्हीने डिसेंबर 2025 मध्ये 14,000 हून अधिक युनिट्सची विक्री करून नवीन विक्रम प्रस्थापित केला. यामुळे तिला 2026 चा प्रतिष्ठित इंडियन कार ऑफ द इयर (ICOTY) पुरस्कार मिळाला, जो भारतातील सर्वोच्च ऑटोमोटिव्ह अवॉर्ड मानला जातो. क्रॅश टेस्टमध्ये मिळालेल्या 5 स्टार सेफ्टी रेटिंगमुळे ही कार सुरक्षा आणि विश्वासार्हतेचे प्रतीक बनली आहे.