esakal | ऑनलाईन व्यवहारात येणाऱ्या कॅप्चा (CAPTCHA) चा अर्थ काय? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

captcha

ऑनलाईन व्यवहारात येणाऱ्या कॅप्चा (CAPTCHA) चा हा आहे अर्थ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आजच्या डिजीटल युगात स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरामुळे बिल असो, बॅंकेचे व्यवहार, खरेदी असे विविध ऑनलाईन व्यवहार करावे लागतात. या ऑनलाईनच्या जमान्यात बहुतांश सामान्य आणि ग्रामीण भागातील लोकांनी तितके हे तंत्रज्ञान अवगत नसते. त्यामुळे असे व्यवहार जेव्हा त्यांच्या वाटेला येतात, तेव्हा त्यांना बऱ्याच अडचणी येतात. आपल्या देशात जर भारताची अर्थव्यवस्था उच्चस्थानी न्यायची असेल तर डिजीटल पेमेंटचे प्रमाण वाढविणेही अत्यावश्यक आहे. ऑनलाईन पेमेंट करताना कधी कधी वन टाईम पासकोड/पासवर्ड किंवा 'कॅप्चा' अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. 'कॅप्चा' हा शब्द बऱ्याचदा येत असल्याने सामान्यांना येथे समजण्यास अडचण येते. तर जाणून घेऊन याबाबत सविस्तर...(meaning-of-captcha-online-payment-marathi-news)

'कॅप्चा' चा अर्थ

CAPTCHA - 'Completely Automated Public Turing Test to Tell Computers and Humans Apart' असा आहे. ही एक टेक्निकल असून ही चाचणी मनुष्य आणि संगणक ह्यामध्ये फरक सिद्ध करते. सर्वच ऑनलाईन व्यवहारात 'कॅप्चा' एक सुरक्षितेतचं काम करतो. आता संगणक म्हटले की सगळ्या गोष्टी ऑटोमेटिक आल्यात. संकेतस्थळावर आढळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत ऑटोमेशन करता येते.संकेतस्थळ सुरु करताना संकेतस्थळ पडताळणी करते की नक्की तुम्हीच आहात की एखादा बॉट छेडखानी करतोय म्हणून हे पाहण्यासाठी संकेतस्थळ 'कॅप्चा' वाटेत सेट करुन ठेवते. 'कॅप्चा' वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ह्यात सोप्पा असा प्रश्न विचारला गेला असतो जो सोडवण्यासाठी थोड डोकं वापरावे लागते.

काय विचारले जाते?

दिलेल्या चित्रांपैकी मोटारसायकल असलेली चित्रे निवडा, चित्रांत दिसणारा कोड काय? इत्यादी. हे प्रश्न असे असतात की जे आपल्याला सोडवणे सोप्पे जाते परंतु बोट्‌सला सोडवणे कठीण. कारण बॉट म्हटला की एक ठराविक संगणक कोड जो ऐनवेळी बदलणे शक्‍य नसतो.

तरी काही बोट्‌स शिकतात आणि 'कॅप्चा' सहज सोडवतात म्हणून 'कॅप्चा' अनेकदा आडवा तिडवा, खराब झालेला, वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या प्रश्नाच्या रुपात आणि प्रत्येक वेळेस वेगळा दाखवतात जेणेकरून मानवी मेंदूच असे उत्तर देऊन शकेल आणि बॉट्‌सला ते जमले नाही पाहिजे. गुगल आता नवीन 'कॅप्चा' वापरते. संभाव्य माहिती विनंती ही माणसाकडून केली जात आहे की संगणक बॉट काही छेडखानी करतोय ते चेक करायला. यात फक्त आपल्याला 'I am not a robot' ह्या बटनाला क्लिक करायचे असते. त्यासाठी आपल्याला हे वाक्‍य वाचावे लागते, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो आणि मग माउस कर्सर त्यावर नेऊन क्लिक करावी लागते. ह्या सगळ्या स्टेप्स पाहिल्या जातात आणि ठरवले जाते की आपण मनुष्य आहात की रोबोट्‌स.

हेही वाचा: शिक्षकांच्या बदलीसाठी लवकरच नवी संगणकप्रणाली