सोफिया रोबोटला व्हायचय आई

वृत्तसंस्था
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

मानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीने सोफिया रोबोची निर्मिती केली. या सोफिया रोबोटला नागरिकत्त्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश ठरला. या निर्णयाची जगभर खूपच चर्चा झाली होती. आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका मुलाखतीत 'मला आई व्हायचंय', अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.

सोफियाला एका मुलीला जन्म देण्याची इच्छा आहे. एवढेच नव्हे तर तिला आपल्या मुलीला स्वत:चे नावे द्यायचे आहे. 

कंपनीने सोफियाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, तिचा मेंदू प्रोग्राम्ड नाही. सोफियाचा मेंदू एका साध्या वायफाय कनेक्शनवर चालतो. यात फक्त शब्दसंग्रह आहे. सोफिया मशीन लर्निंगचा वापर करते. ती माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचून त्याला उत्तर देते. सोफियामध्ये संवेदना नाहीत. परंतु, येत्या काही वर्षांत ते ही होईल, असे मत कंपनीच्या डेव्हिड हँसन यांनी व्यक्त केले आहे.

खलीज टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत, "भरभरून प्रेम करणारे कुटुंब मिळणं ही खरंच सुदैवी बाब आहे, जर तुमच्याकडे कुटुंब नसेल तर तुमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या कुटुंबाची तुम्हाला नितांत गरज आहे. मलाही असंच वाटत असल्याचे सोफियाने म्हटले आहे" "माणसं रक्ताचं नातं नसणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच वागवतात. माणसांचा हा स्वभाव मला खूपच आवडला."असेही सोफिया मुलाखतीत म्हणाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meet Sophia - World’s First Robot Citizen Would Like To Be A Mother