Amazon Shopping : थेट फेसबुक-इन्स्टावरुन करता येणार अमेझॉन शॉपिंग; दोन्ही कंपन्या मिळून आणणार खास फीचर

Facebook Shopping : ही सुविधा सुरुवातीला केवळ ठराविक प्रॉडक्ट्सवर असणार आहे, असंही अमेझॉनने स्पष्ट केलं आहे.
Facebook Amazon Shopping
Facebook Amazon ShoppingeSakal

Facebook-Amazon Shopping : तुम्ही पाहिलं असेल की एखादी गोष्ट जर तुम्ही अमेझॉनवर सर्च केली, आणि त्यानंतर फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर गेला; तर त्याच वस्तूसंबंधित जाहिराती तुम्हाला जास्त दिसू लागतात. मेटा आणि अमेझॉन या कंपन्या एकमेकांसोबत डेटा शेअर करत असल्यामुळे हे घडतं. यालाच एक पाऊल पुढे नेण्याचा कंपन्यांचा विचार आहे.

आता यूजर्सना थेट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरुनच अमेझॉन शॉपिंग करता येणार आहे. यासाठी त्यांना सोशल मीडिया अ‍ॅप्समधून बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. मेटा आणि अमेझॉन या कंपन्या मिळून या फीचरवर काम करत आहेत.

Facebook Amazon Shopping
Amazon Sale : अमेझॉनचा ऐतिहासिक सेल! 100 कोटींहून अधिक नागरिकांचा सहभाग; 80 टक्क्यांहून अधिक ग्राहक छोट्या शहरांतील

हे फीचर लाँच झाल्यानंतर यूजर्सना आपलं फेसबुक किंवा इन्स्टा अकाउंट अमेझॉनशी लिंक करावं लागणार आहे. यानंतर तुम्हाला फेसबुकवर एखाद्या गोष्टीची जाहिरात दिसली, की तिथूनच ती खरेदी करता येणार आहे. टेक क्रंचने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. (Tech News)

हे फीचर सर्वात आधी अमेरिकेत लाँच केलं जाईल. यूजर्सना फेसबुक आणि इन्स्टावर दिसणाऱ्या जाहिरातींमध्येच वस्तूंची किंमत, प्राईम ऑफर्स, डिलिव्हरी टाईम आणि इतर डीटेल्स दिसतील. तिथूनच ऑर्डर प्लेस करून ती ट्रॅक करण्याचा पर्यायही यूजर्सकडे असणार आहे. ही सुविधा सुरुवातीला केवळ ठराविक प्रॉडक्ट्सवर असणार आहे, असंही अमेझॉनने स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com