Elon Musk : फेसबुकच्या इंजिनिअरने केली इलॉन मस्कची बोलती बंद; म्हणाला होता माणसांपेक्षा हुशार होईल 'एआय'

AI : इलॉन मस्कने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं, की पुढच्या एका वर्षात एआय हे एका माणसापेक्षा अधिक हुशार होईल.
Elon Musk AI
Elon Musk AIeSakal

Elon Musk on AI : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क हे कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच इलॉनने एआयबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. पुढील वर्षीपर्यंत एआय एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक हुशार होईल असं ते म्हणाले होते. मात्र, त्यांचा हा दावा फेसबुकच्या एका इंजिनिअरने खोडून काढला आहे. सोबतच त्याने इलॉनला ईव्हीवरुन चिमटाही काढला आहे.

काय म्हणाला होता इलॉन?

इलॉन मस्कने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं, की पुढच्या एका वर्षात एआय हे एका माणसापेक्षा अधिक हुशार होईल. तसंच, 2029 सालापर्यंत एआय हे पृथ्वीवरीस सर्व माणसांपेक्षा अधिक हुशार होईल. मस्कच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. यातच मेटाचे चीफ सायंटिस्ट यान लेकन (Yann LeCun) यांनीही उडी घेतली.

Elon Musk AI
Elon Musk on Grok : ओपन एआय सारखी नफेखोर नसणार आमची कंपनी; 'ग्रॉक' असणार पूर्णपणे ओपन सोर्स! इलॉन मस्कची मोठी घोषणा

खोडला मस्कचा दावा

यान यांनी मस्कच्या दाव्याला स्पष्ट विरोध केला. ते म्हणाले की असं शक्यच नाही. सध्या एखादा 17 वर्षांचा मुलगा काही तासांच्या प्रॅक्टिसनंतर कार चालवायला शिकू शकतो. एआय जर एवढंच हुशार असतं, तर तेही स्वतःला 20 तासांमध्ये कार चालवायला शिकवू शकलं असतं. या उदाहरणाने यान यांनी मस्कचा दावा खोडून काढला.

मस्कला काढला चिमटा

आपल्याकडे अजूनही पूर्णपणे स्वयंचलित आणि विश्वासार्ह सेल्फ-ड्रायव्हिंग कार्स नाहीत. भले मग आपल्याकडे (तुमच्याकडे) कित्येक तासांचा लेबल्ड ट्रेनिंग डेटा असेना; असं म्हणत यान यांनी इलॉन मस्कला चिमटा घेतला. त्यांचा रोख मस्कच्या स्वयंचलित टेस्ला कार्सकडे होता. टेस्लाने स्वयंचलित इलेक्ट्रिक कार्स तयार केल्याचा दावा केला आहे. मात्र त्यातील ऑटो-ड्रायव्हिंग फीचर सुरक्षित नसल्याचं वारंवार स्पष्ट झालं आहे.

Elon Musk AI
EV Policy: टेस्लासाठी भारताचा मार्ग खुला! सरकारने नवीन ईव्ही धोरण केले जाहीर, काय आहे नवीन धोरणात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com