

Mark Zuckerberg Unveils Privacy-Focused Smart Glasses and AI Hardware Device
esakal
Meta Launches Camera-Less Ray-Ban Glasses: मेटा (Meta) कंपनीच्या वार्षिक 'मेटा CONNECT' सोहळ्यात CEO मार्क झुकरबर्ग यांनी अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपकरणांचे अनावरण केले. युझर्सच्या गोपनीयतेची (Privacy) काळजी घेत कंपनीने यावेळी कॅमेरा नसलेले विशेष स्मार्ट ग्लासेस सादर केले आहेत. याशिवाय आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वापरकर्त्यांपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी 'म्युझ चार्म' (Muse Charm) हे छोटे पॉकेट डिव्हाइसदेखील लाँच केले आहे.