
Reels बनवायला आवडतं? कमवा महिन्याचे तीन लाख, Facebook ची मोठी घोषणा
सोशल मीडिया प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलाय. सोशल मीडियाला मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले जाते. त्यात सध्या रिल हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. तुम्हालाही सोशल मिडियावर रिल बनवणे आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीची रिल्स बनवून कमाई करु शकता. तुम्हाला वाटत असेल, हे कसं शक्य आहे. पण हे खरं आहे. आता तुम्ही रिल्सच्या माध्यमातून फेसबुकवरूनही कमाई करू शकता. (Meta has announced to earn up to 3 lakh per month for making Reels on Facebook)
Reels च्या माध्यमातून तुम्ही दरमहा 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकता. फेसबुकच्या मालकीच्या कंपनी मेटाने याबाबत माहीती दिली.
हेही वाचा: WhatsApp Features : व्हॉट्सॲपकडून ‘यूजर फ्रेंडली’ फीचर्स!
रिल्सवरील व्यूजच्या संख्येवर कमाई अवलंबून असणार. हा पेमेंट डॉलर्स मध्ये दिला जाईल. रिल्सच्या माध्यमातून दरमहा 4,000 डॉलर्स पर्यंत कमावण्याची संधी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर आपण या डॉलरचे रुपांतर भारतीय चलनात केले आहे तर याची रक्कम सुमारे 3 लाखाच्या वरती आहे.
हेही वाचा: आता डिझेल मिळणार घरपोच; 'ही' कंपनी सुरू करणार होम डिलिव्हरी
Facebook वर "चॅलेंजेस" सादर करण्यात येईल, जे क्रिएटर्संना कॉन्टेंटद्वारे कमाई करण्यास मदत करणार. याद्वारे कॉन्टेंट क्रिएटर्संला चार हजार डॉलर पर्यंत कमाई करता येईल.
रिल्सची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. फिल्म स्टार, क्रिकेटर्स आणि इतर सेलिब्रिटी यांच्यासोबत अनेक साधारण यूजर्ससुद्धा रिल्स बनवतात. त्यांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे.
Web Title: Meta Has Announced To Earn Up To 3 Lakh Per Month For Making Reels On Facebook
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..