Instagram Auto-Blur Nudes : 'न्यूड फोटो' आपोआप होणार ब्लर, इन्स्टाग्राम मेसेजसाठी मेटा आणणार नवीन फीचर

Meta Safety Feature : इन्स्टाग्रामवर कित्येक किशोरवयीन मुला-मुलींसोबत मोठ्या प्रमाणात फसवणूकीचे प्रकार घडतात. गोड बोलून न्यूड्स शेअर करायला सांगणे आणि मग समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणे असे प्रकार वाढत आहेत.
Instagram Auto-Blur Nudes
Instagram Auto-Blur NudeseSakal

Instagram new safety feature : इन्स्टाग्राम आपल्या यूजर्सच्या सुरक्षेसाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. आता इन्स्टाच्या डायरेक्ट मेसेज (डीएम) साठी अशाच एका सेफ्टी फीचरवर काम सुरू आहे. यामुळे मेसेजमध्ये न्यूड कंटेंट पाठवल्यास तो आपोआप ब्लर होणार आहे. सेक्शुअल स्कॅम आणि फोटोंचा गैरवापर टाळण्यासाठी हे फीचर आणण्यात येईल असं मेटाने स्पष्ट केलं आहे.

मेटाने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीने जर न्यूड कंटेंट असलेला फोटो पाठवला; तर समोरच्या व्यक्तीला तो फोटो ओपन करण्यापूर्वी ब्लर वॉर्निंग स्क्रीन येईल. यानंतर तो फोटो पहायचा की नाही यासाठी पर्याय उपलब्ध करण्यात येईल. (Instagram DM Nude Messages)

"असे मेसेज पाठवणाऱ्या आणि रिसीव्ह करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना ऑनलाईन चॅटिंगबाबत सेफ्टी टिप्स सांगणाऱ्या पेजवर रिडायरेक्ट करण्यात येईल. अशा फोटोंचा गैरवापर केला जाऊ शकतो असा इशारा याठिकाणी दिलेला असेल." असंही मेटाने सांगितलं. तसंच जोपर्यंत एखाद्या मेसेजला कोणी रिपोर्ट करत नाही, तोपर्यंत मेटाला या फोटोंचा अ‍ॅक्सेस नसेल असंही मेटाने स्पष्ट केलं. (Instagram DM Safety Feature)

Instagram Auto-Blur Nudes
Instagram Reels : इन्स्टाग्राम रील्स व्हायरल जात नाहीत? फॉलो करा या सोप्या टिप्स; जाणून घ्या अपलोड करण्याची योग्य वेळ

इन्स्टाग्रामवर कित्येक किशोरवयीन मुला-मुलींसोबत मोठ्या प्रमाणात फसवणूकीचे प्रकार घडतात. अपलोड केलेले फोटो एआयच्या मदतीने एडिट करणे, गोड बोलून न्यूड्स शेअर करायला सांगणे आणि मग त्या फोटोंचा वापर करुन समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणे असे प्रकार वाढत आहेत.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर यामुळे लहान आणि किशोरवयीन मुलं सुरक्षित नसल्याचा आरोप बऱ्याच काळापासून केला जातो आहे. त्यामुळेच मेटा याविरोधात पावलं उचलत आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत अमेरिकेच्या संसदेत पीडित मुलांच्या पालकांची माफी देखील मागितली होती.

Instagram Auto-Blur Nudes
Instagram Data Tracking : इंन्स्टाग्राम तुमच्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवतंय, कसं थांबवाल ट्रॅकिंग?

कसं काम करेल फीचर?

  • बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार किशोरवयीन मुला-मुलींना गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवतात.

  • त्यानंतर मेसेजच्या माध्यमातून न्यूड्सची मागणी केली जाते.

  • या न्यूड फोटोंचा त्यानंतर गैरवापर केला जातो. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडतात.

  • यामुळे इन्स्टाग्रामवर हे नवीन फीचर अशा मेसेजना ट्रॅक करेल.

  • एखाद्या व्यक्तीने मेसेजमध्ये न्यूड्स पाठवले, तर ते आपोआप ब्लर होतील. हे मेसेज पहायचे की नाही त्याचा पर्याय व्यक्तीकडे असेल.

  • हे फीचर जगभरातील 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींच्या अकाउंट्सना लागू केलं जाईल.

  • त्याहून अधिक वयाच्या यूजर्सना हे फीचर ऑप्शनल स्वरुपात मिळेल. हे फीचर सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com