Mexico Aliens : मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकांनी समोर आणले एलियन्सचे मृतदेह? व्हिडिओ होतोय व्हायरल

Alien Corpses : हे मृतदेह सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचं म्हटलं जात आहे.
Mexico Aliens Video
Mexico Aliens VideoeSakal

मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकांनी एलियन्सचे मृतदेह मिळाल्याचा दावा केला आहे. या वैज्ञानिकांनी दोन मृतदेहांचं प्रदर्शन केलं. हे मृतदेह सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

परग्रहावर राहणारे जीव, म्हणजेच एलियन्सबद्दल मानवाला मोठं कुतूहल आहे. आजपर्यंत कित्येक चित्रपटांमधून आणि पुस्तकांमधून एलियन्सचा उल्लेख करण्यात आला आहे. हे एलियन्स कसे दिसत असतील याबाबत कित्येकांनी कल्पना केली आहे. मात्र, आता मेक्सिकोमधील हे एलियन खरे असतील, तर परग्रहवासींच्या अस्तित्त्वाबाबत हा ठोस पुरावा मानला जाऊ शकतो.

हे एलियन्स पेरू देशातील कौस्को येथील खाणींमध्ये आढळले असल्याचा दावा करण्यात आला आहे. मेक्सिकोमध्ये संसदेत यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Mexico Aliens Video
Alien Message : एलियन्स खरंच आहेत? जपानी प्राध्यापकाने 40 वर्षांपूर्वी पाठवला होता संदेश; आता अंतराळातून येणार उत्तर

मेक्सिकोतील पत्रकार आणि यूएफओ शास्त्रज्ञ जॅमी मौसान यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. जॅमी हे एलियन्सबद्दल कित्येक वर्षांपासून अभ्यास आणि संशोधन करत आहेत. मेक्सिकोतील काही इतर वैज्ञानिकांचीही मदत त्यांना या कार्यक्रमासाठी झाली.

हे एलियन्स आपल्या पृथ्वीवरील नाहीत. मात्र, हे यूएफओ सोबत नव्हे तर चक्क पेरूमधील एका खाणीत आढळले आहेत. यांना शोधल्यानंतर त्यांचं फॉसिलायझेशन करण्यात आलं; असं जॅमी यावेळी म्हणाले.

Mexico Aliens Video
Area 51 नाही, तर 'ही' आहे पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित जागा; लोक म्हणतात इथं दडवून ठेवलेत एलियन्स

मौसान यांनी यावेळी मेक्सिको सरकार आणि अमेरिकेतील अधिकाऱ्यांना संबोधन केले. ते म्हणाले, की मेक्सिकोतील ऑटोनॉमस नॅशनल युनिवर्सिटी येथे एलियन्सच्या मृतदेहांची चाचणी करण्यात आली होती. याठिकाणी वैज्ञानिकांनी रेडिओकार्बन डेटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने एलियन्सच्या डीएनएचा अभ्यास केला.

या कार्यक्रमाला अमेरिकेतील माजी नेव्ही पायलट रायन ग्रेव्ह्स देखील उपस्थित होते. रायन हे अमेरिकन्स फॉर सेफ एअरोस्पेस या संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. आपल्या कारकीर्दीमध्ये आपण एलियन्स पाहिले होते, असा दावा रायन यांनी यापूर्वी केला आहे.

Mexico Aliens Video
US Aliens : अमेरिकेने लपवून ठेवले एलियन्सचे मृतदेह; माजी नेव्ही अधिकाऱ्याचा थेट संसदेत दावा! काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com