mg motor india launched mg expert digital car exploration platform know how it works
mg motor india launched mg expert digital car exploration platform know how it works

MG मोटर्सचा कार एक्सप्लोरेशन प्लॅटफॉर्म लॉंच; वाचा काय असेल खास

एमजी मोटर इंडियाने बुधवारी त्यांचे डिजिटल कार एक्सप्लोरेशन प्लॅटफॉर्म (Car Exploration Platform) एमजी एक्सपर्ट (MG expert) लाँच केले, जे ग्राहकांना प्रॉडक्ट शोधणे यासोबतच ऑनलाइन बुकिंग यासारख्या अनेक गोष्टी सहज करता येणार आहेत. ज्या ग्राहकांना MG कारबद्दल तपशीलवार माहिती हवी आहे आणि डीलरशिपला भेट द्यायची नाही त्यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. (mg motor india launched mg expert digital car exploration platform)

कंपनीने सांगितले की, या प्लॅटफॉर्मद्वारे, एक्सपर्ट एमजी उत्पादनांचे सर्व फीचर्स ग्राहकांना त्यांच्या घरात बसून पाहयाला मिळतील, तेही कोणत्याही फिजीकल किंवा डिजिटल संपर्काशिवाय. यामध्ये ग्राहकांना अशा अनेक सुविधा मिळतील, ज्यामध्ये ग्राहकांना उत्पादनाची अतिशय सोप्या पध्दतीने माहिती घेता येईल आणि खरेदीसाठी सोपे ऑप्शन्स उपलब्ध होतील.

mg motor india launched mg expert digital car exploration platform know how it works
Paytm देतंय कुठल्याही गॅरंटीशिवाय 5 लाखांचं कर्ज; वाचा प्रोसेस

एमजी मोटर इंडियाचे प्रमुख व्यावसायिकअधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, "आम्हाला मानव-संचालित, साऊंड एनेबल, एआय-सपोर्टेड प्लॅटफॉर्म एमजी एक्स्पर्ट लाँच करण्याचा आनंद होत आहे. ऑटो-टेक ब्रॅण्ड म्हणून एमजीने भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये अनेक इंडस्ट्री फर्स्टस सादर केले आहेत. आमच्या ब्रॅण्ड तत्त्वामध्ये ग्राहकांना तंत्रज्ञान-सक्षम एकसंधी अनुभव देण्याला प्राधान्य देत एमजी एक्स्पर्ट उत्पादनाच्या वैशिष्ट्यांपासून मालकीहक्कापर्यंत विविध चौकशीसाठी वन स्टॉप सुलभ व सोईस्कर सोल्यूशन म्हणून काम करते. आम्ही ग्राहकांना त्यांच्या घरामध्येच आपल्या सोयीने सुधारित, माहतीपूर्ण, परस्परसंवादी व तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत प्रॉडक्ट एक्स्प्लोरेशन अनुभव देण्यास उत्सुक आहोत."

'लाइव्ह स्ट्रिमिंग' एआर ऑन-वेईकलसह ग्राहक त्यांच्या घरामध्ये आरामात प्रत्यक्ष कार देखील पाहू शकतात, सोबत रंगसंगती आणि फायनल लुक व फिलसाठी कारला अॅक्सेसराइज करू शकतात. ग्राहक स्टेप-बाय-स्टेप माहितीसोबत खरेदीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी प्रॉडक्ट एक्स्पर्टससोबत प्रत्यक्ष कनेक्ट होऊ शकतात. कारच्या व्हर्च्युअल लुकव्यतिरिक्त एमजी एक्स्पर्टस् ग्राहकांना ऑन-रोड किंमत, अपेक्षित डिलिव्हरी तारीख व व्हेरिएंटची तुलना याची देखील माहिती देऊ शकतात, ज्यामुळे घरामध्येच डिलरशिपमध्ये असल्यासारखा अनुभव मिळू शकतो. तसेच ग्राहक त्यांच्या जवळच्या डिलरशिपमध्ये टेस्ट ड्राइव्ह देखील बुक करता येईल.

mg motor india launched mg expert digital car exploration platform know how it works
नव्या अवतारात येतेय WagonR 2022, काय असेल किंमत फीचर्स? वाचा

एसेन्ट्रिक इंजिनचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी वरूण शाह म्हणाले की, "आम्हाला उत्पादनांच्या एकीकृत श्रेणीसह व्हर्च्युअल इंटरअॅक्शन्सना नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एमजी मोटरसोबतचा आमचा सहयोग अधिक दृढ करण्याचा आनंद होत आहे. आमचा नवीन एक्स्पेरिअन्स मॅनेजर आमचे भागीदार एमजी मोटर व त्यांच्या डिलरशिप सहयोगींना परस्परसंवाद साधण्याच्या स्वरूपामध्ये परिवर्तन करत त्यांच्या ग्राहकांशी अद्वितीय संबंध निर्माण करण्याची व्यापक संधी देईल."

एमजी एक्स्पर्ट व्यासपीठ एमजी मोटर इंडियाचा मुलभूत विश्वास 'पॉवर ऑफ चॉईस'च्या तत्त्वावर डिझाइन करण्यात आले आहे. हे व्यासपीठ ग्राहकांना त्यांच्या घरामध्येच आरामशीपणे स्मार्ट एमजी वाहने खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांचा शोध, अनुभव घेण्यासोबत योग्य निर्णय घेण्यामध्ये सक्षम करेल.

mg motor india launched mg expert digital car exploration platform know how it works
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com