MG ZS EV ला मिळतेय भारतीयांची पसंती; 2021 मध्ये 145% वाढली विक्री

mg zs ev
mg zs ev

mg zs ev : सध्या लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, या दरम्यान एमजी मोटर इंडियाची (MG Motor India) एकमेव इलेक्ट्रिक कार MG ZS EV ला भारतात चांगली पसंती मिळताना दिसत आहे. या इलेक्ट्रिक कारची विक्री, 2021 मध्ये 145% ने वाढून 2,798 युनिट्स झाली आहे. MG ZS EV भारतात जानेवारी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली असून लॉन्च झाल्यानंतर या कारचे फेसलिफ्ट गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात आले होते. दुसरीकडे, MG ZV EV च्या रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार पूर्ण चार्ज केल्यानंतर 419 किमी अंतर चालते.

2021 मध्ये 145% वाढ

MGZS EV ला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे तर 2020 मध्ये या इलेक्ट्रिक कारच्या 1,142 युनिट्सची विक्री झाली. त्याच वेळी, 2021 मध्ये त्याची संख्या वाढून 2,798 युनिट्स झाली. हे सुमारे 145% ची वाढ आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, भारतात या इलेक्ट्रिक कारसाठी दरमहा सरासरी 700 बुकिंग होतात.

Nexon EV नंतर MG ZS EV ची सर्वाधिक विक्री

Tata Nexon EV ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे, जी ग्राहकांची पहिली पसंती आहे. ही कार एका चार्जमध्ये सुमारे 312 किमीची चालते. जरी MG ZS EV फीचर आणि रेंजच्या बाबतीत Tata Nexon पेक्षा खूप पुढे आहे, त्यांच्या किंमतींमध्ये देखील खूप फरक आहे. तुम्हाला Tata Nexon EV वर सरकारी अनुदानाचा लाभ मिळतो, ज्यामुळे या कारची किंमत खूपच कमी आहे. त्याच वेळी, तुम्हाला ZS EV मध्ये असा कोणताही फायदा मिळत नाही.

mg zs ev
Jio, Airtel आणि Vi चे 3GB डेली डेटा प्लॅन, मिळेल फ्री कॉलिंगसह बरंच

किंमत किती आहे

दुसरीकडे, त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 21.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. MG ZS EV एक्साईट आणि एक्सक्लुझिव्ह अशा दोन व्हेरिएंटमध्ये येते.

कारचे स्पेसिफिकेशन्स

जर आपण त्याच्या पॉवर आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, MG ZS EV च्या लेटेस्ट मॉडेलमध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 143PS ची पॉवर आणि 350Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त 8.5 सेकंदात 100 kmph चा वेग पकडू शकते. यामध्ये 44.5 KWH हाय-टेक बॅटरी पॅकचा देण्यात आला आहे जो जास्तीत जास्त 419 किमीपर्यंत चालू शकतो. ही कार 0-80 टक्के चार्ज होण्यासाठी 40 मिनिटे लागतात. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 6 एअरबॅग मिळतात. याचा ग्राउंड क्लीयरन्स 177mm आहे, जो सेगमेंटमधील इतर कारच्या तुलनेत खूप जास्त आहे. ही कार ऑटोमॅटीक ट्रांसमिशनवर काम करते.

mg zs ev
ओमिक्रॉन सामान्य सर्दी-खोकला नाही; केंद्र सरकारचा सतर्कतेचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com