

esakal
AI
New Delhi : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ प्रश्नांची उत्तरे देणारे तंत्रज्ञान राहिलेले नाही. ते माणसांसोबत संवाद साधते. निर्णय घेण्यास मदत करते. अनेक कामे स्वतः पूर्ण करते. त्यामुळे भविष्यात एआयला माणसासारखी जाणीव निर्माण झाली तर काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.