Microsoft Down! आऊटलूक, टीम्ससह अनेक सेवा बंद पडल्यानं युजर्स वैतागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Microsoft News

Microsoft Down! आऊटलूक, टीम्ससह अनेक सेवा बंद पडल्यानं युजर्स वैतागले

Microsoft Down: मायक्रोसॉफ्ट या टेक कंपनीच्या सेवा अचानक बंद पडल्यानं युजर्स वैतागले आहेत. यामध्ये आऊटलूक, गिटहब, टीम्स, अझुरे, लिंक्डइन अशा विविध सेवांचा समावेश आहे. या सेवा वापरता येत नसल्यानं नक्की काय प्रकार घडला आहे, हे युजर्सना कळत नसल्यानं ट्विटिरवर यासंबंधी प्रश्न विचारले जात आहेत. (Microsoft services such as 365 Outlook GitHub Teams Azure appear to be down)

मायक्रोसॉफ्टचा ई-मेल प्लॅटफॉर्म असलेल्या आऊटलूकची सेवा भारतासह इतर काही देशांमध्ये बंद असल्याचं ट्विटरवरील अनेक तक्रारींवरुन सांगितलं जात आहे. या सेवा बंद झाल्यामागे सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचं कारणही सांगितलं जात आहे. पण कंपनीकडून अद्याप यावर कुठलंही स्पष्टीकरण न आल्यानं युजर्सना मात्र काही कळेनासं झालं आहे. त्यामुळं अनेक युजर्सनं थेट मायक्रोसॉफ्टकडं याबाबत तक्रारी केल्या आहेत. काही युजर्सना मायक्रोसॉफ्टचं व्हिडिओ कॉलिंग अॅप देखील चालत नाहीए.