गोंदिया जिल्ह्यात नुकतीच खिशातील मोबाइलचा स्फोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने मोबाइल हाताळताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे..मोबाइलचा स्फोट होऊ नये यासाठीचार्जिंग दरम्यान योग्य काळजी घ्या केवळ ओरिजिनल चार्जर आणि केबलच वापरा. ओव्हरचार्ज होऊ नये म्हणून मोबाइल चार्जिंग पूर्ण झाल्यावर लगेच प्लग काढा. चार्जिंग करताना उष्णता निर्माण होत असल्यास चार्जिंग थांबवा.जास्त उष्णतेपासून मोबाइलला वाचवा. मोबाइल थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी ठेवू नका. जास्त हेवी गेम्स किंवा अॅप्स दीर्घकाळ चालवल्याने मोबाइल गरम झाल्यास त्याचा वापर थांबवा. मोबाइल गरम होण्याचा त्रास सतत होत असल्यास ताबडतोब तंत्रज्ञाला दाखवा.योग्य बॅटरीची काळजी घ्या. बॅटरी फुगल्यास किंवा खराब झाल्यास ती लगेच बदला. नॉन-ब्रँडेड किंवा डुप्लिकेट बॅटरीचा वापर करू नका..मोबाइल पाण्याच्या संपर्कात येण्यापासून वाचवा. गरम वातावरणात मोबाइल चार्जिंग करणे टाळा.मोबाइलवर प्रोटेक्टिव्ह केस लावा पण त्याने उष्णता अधिक वाढत असल्यास बदल करा.मोबाइलचे सॉफ्टवेअर आणि अॅप्स नेहमी अपडेट ठेवा, कारण जुने सॉफ्टवेअर डिव्हाइसच्या सुरक्षिततेवर परिणाम करू शकतात.चार्जिंग करताना मोबाइल वापरणे टाळा. फॅक्टरी डिफेक्ट असल्यास कंपनीकडून त्वरित बदल करून घ्या..खराब झालेले चार्जिंग पॉइंट्स किंवा सॉकेट्स वापरणे टाळा. चार्जरची वायर तुटलेली किंवा खराब झाली असल्यास नवीन चार्जर खरेदी करा.मोबाइल खाली पडल्याने बॅटरीला नुकसान झाल्यास ती त्वरित तपासून घ्या. बॅटरीवर शारीरिक दाब येणार नाही याची काळजी घ्या.अनधिकृत कस्टम ROM किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे टाळा. डिव्हाइसचा ओव्हरक्लॉकिंग (प्रोसेसर जास्त शक्तीवर चालवणे) करू नका.फार थंड (0°C पेक्षा कमी) किंवा फार गरम (45°C पेक्षा जास्त) ठिकाणी मोबाइल वापरणे टाळा..प्रवासादरम्यान मोबाइल गरम होऊ नये यासाठी तो हवा खेळती असलेल्या पिशवीत ठेवा.मोबाइल चार्जिंगसाठी रात्री किंवा दीर्घ वेळासाठी प्लग इन करून ठेवू नका. २० टक्के ते ८० टक्क्यांच्या दरम्यान चार्जिंग राखणे चांगले मानले जाते.वायरलेस चार्जर वापरत असल्यास तो ब्रँडेड व प्रमाणित असावा. पॉवर बँक वापरताना तिची क्षमता आणि दर्जा तपासा.जर मोबाइल वॉटरप्रूफ असेल, तरीही दीर्घकाळ पाण्यात ठेवणे टाळा. पाण्यात भिजलेला मोबाइल लगेच चार्जिंगला लावू नका..Chh. Sambhajinagar Water Crisis : निवडणुका आल्या अन् गेल्या, पण पाण्याचे काय?.अनधिकृत अॅप्स डाऊनलोड करू नका, कारण ते बॅटरीवर आणि प्रोसेसरवर अनावश्यक ताण देऊ शकतात. मोबाइलमध्ये अँटीव्हायरस किंवा मालवेअर स्कॅनर ठेवा. मोबाइलला मार लागणार नाही किंवा तो फेकला जाणार नाही याची काळजी घ्या. मोबाइल हाताळताना खूप घट्ट पकडणे किंवा सतत दाब देणे टाळा.— सुनील डिडोरे, टेक्निशियन.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.