प्रोसेसर नेमका कुठला हवा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोसेसर

प्रोसेसर नेमका कुठला हवा?

आजकाल कोणताही मोबाईल खरेदी करताना, त्यात कुठले प्रोसेसर आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत याबाबत ग्राहक सजग झाले आहेत. सध्या बहुतांश अॅण्ड्रॉईड मोबाईलमध्ये वापरले जाणारे प्रोसेसर म्हणजे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन आणि मीडियाटेक हेलिओ. या दोन्ही प्रोसेसरमधील फरक आणि वैशिष्ट्यांबाबत...

१. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन

अमेरिकेतील सॅनडिएगो येथे १९८५मध्ये स्थापन झालेल्या क्वालकॉम कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेले क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सध्या सर्वाधिक वापरले जाणारे प्रोसेसर म्हणून ओळखले जाते. क्वॉलकॉमकडून पहिला प्रोसेसर २००७मध्ये सादर करण्यात आला. त्यानंतर बदलत्या तंत्रज्ञानानुसार वेगवेगळे प्रोसेसर सादर करण्यात आले. पुढे २०१५मध्ये क्वॉलकॉमने रिब्रॅण्डिंग करत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन असे नामकरण केले. त्यानुसार नव्या वैशिष्ट्यांसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगनच्या अनेक अद्ययावत आवृत्त्या निघाल्या. सध्या 8 Gen 1 हे अद्ययावत प्रोसेसर बाजारात उपलब्ध आहेत.

वैशिष्ट्ये...

 • मल्टिकोअर सीपीयू असल्याने उत्तम परफॉर्मन्स

 • स्नॅपड्रॅगनमध्ये १० कोअरपर्यंत प्रोसेसर उपलब्ध

 • अद्ययावत, सुरक्षित आणि उत्तम ग्राफिक्स क्षमता

 • एआय आणि ऑग्मेन्टेड रिअॅलिटीशी सुसंगत

 • विविध प्रोसेसरच्या आतापर्यंत २, ४, ६,७ आणि ८ अशा अत्याधुनिक सीरिज

 • उर्जेची कमी आवश्यकता भासत असल्याने बॅटरीवर परिणाम नाही

 • सुरक्षेच्या बाबतीत अधिक अग्रेसर

 • स्वतःचे ग्राफिक्स प्रोसेसर युनिट

२. मीडियाटेक हेलिओ

तैवानमध्ये १९९७मध्ये स्थापन झालेली मीडियाटेक कंपनी सध्या जगातील आघाडीची सेमीकंटक्टर उत्पादक कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. सध्या अनेक कंपन्यांच्या मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगनच्या तुलनेत मीडियाटेकचे प्रोसेसर पाहायला मिळतात. त्यातही मीडियाटेक हेलिओ आणि मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरचा वाटा लक्षणीय आहे. बाजाराची आणि ग्राहकांच्या मागणीचा विचार करता मीडियाटेककडून हेलिओ पी60 मध्ये मिडरेंज मोबाईल श्रेणीमध्ये एआय प्रोसेसिंग युनिटचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या मीडियाटेकचे डायमेन्सिटी सीरिजमध्ये अत्याधुनिक प्रोसेसर उपलब्ध आहेत.

वैशिष्ट्ये...

 • मल्टिटास्किंग क्षमता उत्तम असल्याने परफॉर्मन्सही चांगला

 • मीडियाटेकमध्ये तर आता १२ कोअरपर्यंत प्रोसेसर उपलब्ध होणार

 • किंमत कमी असल्याने अनेक मिडरेंड मोबाईलमध्ये वापर

 • विविध प्रोसेसरची हेलिओ ए, पी, एक्स, जी आणि आता डायमेनन्सिटी सीरिज लॉन्च

 • ऊर्जेचा वापर अधिक होत असल्याने बॅटरी लवकर डिस्चार्ज

 • चीन आणि भारतात सर्वाधिक वापर

 • स्वतःचे ग्राफिक चिपसेट उपलब्ध नसल्याने इतर चिपसेटचा वापर

 • सुरेक्षेच्या बाबतीत काहीप्रमाणात त्रुटी

हे नक्की तपासा...

 • प्रोसेसरमध्ये किती कोअरचे प्रोसेसर आहे, यापेक्षा ते किती कार्यक्षम आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरते

 • मीडियाटेक प्रोसेसरचे मोबाईल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरच्या मोबाईलच्या तुलनेत स्वस्त असतात.

 • स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेले मोबाईल कमी बॅटरी खर्च करतात.

 • मीडियाटेकच्या तुलनेत स्नॅपड्रॅगनचे प्रोसेसर बहुतांश अॅपशी सुसंगत आहेत.

 • स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेले मोबाईल मीडियाटेकच्या तुलनेत काहीसे महागडे असतात.

Web Title: Mobile Procesor Confusion Guidence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mobilescience