पालकांनो सावधान! मुलांच्या मोबाईल गेम्समुळे होईल तुमचे बॅंक अकाउंट रिकामे | Sci-Tech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांनो सावधान! मुलांच्या मोबाईल गेम्समुळे होईल तुमचे बॅंक अकाउंट रिकामे
पालकांनो सावधान! मुलांच्या मोबाईल गेम्समुळे होईल तुमचे बॅंक अकाउंट रिकामे

पालकांनो सावधान! मोबाईल गेम्समुळे होईल तुमचे बॅंक अकाउंट रिकामे

सध्या बहुतांश लोकांना मोबाईलमधील गेम्सचे (Mobile Games) आकर्षण आहे. मुलांना तर मोबाईल हातात पडला की केव्हा गेम्स खेळतोय असे होते. अनेक मुले मोबाईलवर गेम्स खेळतात. काही गेम्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करताना किंवा ऑनलाइन गेम्स खेळताना वेपन, कॉईन आदी घेतले जातात. पण जर अ‍ॅप किंवा मोबाईल आपल्या बॅंकेच्या अकाउंटशी जोडलेले असेल तर आपल्या अकाउंटमधून पैसे कट होऊ शकतात. हे टाळण्यासाठी ऑनलाइन गेम्सबाबत मुलांनी व पालकांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार! विलिनीकरणाला 'हा' अडथळा

गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी घरातील जवळपास सर्वांकडे मोबाईल आला आहे. अनेकांच्या घरी वाय-फाय सुविधा घेण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन गेम्स खेळताना डेटाची कमतरता भासत नाही. अनेक शालेय व महालिद्यालयीन मुले-मुली या गेम्सबाबत अ‍ॅडिक्‍ट झाल्यासारखे चित्र आहे. लहान मुले प्ले स्टोअरवर जातात व तिथे हवी असेल ती गेम डाउनलोड करून घेतात. अनेक पालकांचे बॅंक अकाउंट मोबाईलमधील विविध अ‍ॅप्सना बऱ्याचवेळा कनेक्‍टेड असते. अनेक गेम्स तर डाउनलोड करतानाच पैसे पे करावे लागतात. तेव्हा त्याची रक्कम खात्यातून कट होते.

काही गेम्समध्ये मुलांना खेळण्यासाठी वेपन, कॉईन, जॅकेट, कॅप, सुरक्षाचक्र, व्हेईकल, मॅजिक पिस्टल यासह अनेक कॉईन घ्यावे लागतात. त्यांची किंमत 50 रुपयांपासून हजारांपर्यंत असते. खेळताना मुले हे कॉईन घेतात व त्याचे पैसे बॅंकेच्या खात्यातून कट होतात. या कट झालेल्या पैशांचा मेसेज अनेकवेळा येत नाही, त्यामुळे पालकांनाही याबाबत कळत नाही. काहींना बॅंक स्टेटमेंट चेक करण्याची सवयही नसते. परंतु जेव्हा केव्हा बॅंक स्टेटमेंट काढले जाते तेव्हाच पैसे कट झालेले कळते.

अशी घ्या काळजी

हे टाळण्यासाठी शक्‍यतो स्वतः किंवा मुलांनी ऑनलाइन गेम्स खेळताना मोबाईलमधील सेटिंग बदलावी. सर्व ऍप्सना बॅंक अकाउंट कनेक्‍ट करू नये. गेम खेळताना पैसे कट होणारे कॉइन किंवा इतर काही शक्‍यतो विकत घेऊ नये. मुलांना मोबाईलचा योग्य वापर करण्याबाबत सर्व माहिती द्यावी. आपली मुले मोबाईलवर कोणत्या प्रकारचे गेम्स खेळतात याबाबत पालकांना माहिती आवश्‍यक आहे. योग्य ती काळजी घेतल्यास आपल्या खात्यातील रक्कम कट होण्यापासून वाचू शकते.

हेही वाचा: आईवडिलांना वाटले की मुलगी इंजिनिअर किंवा डॉक्‍टर होईल, पण..!

लहान मुले मोबाईलवर कोणत्या प्रकारचे गेम्स खेळतात याकडे पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे. पैसे खात्यातून कट होतात असे वाटल्यास त्याबाबत सर्व माहिती मुलांना दिली पाहिजे. मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. पालकांनी देखील मुलांना मैदानावर घेऊन जावे.

- विक्रांत बोधे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कुर्डुवाडी पोलिस ठाणे

loading image
go to top